कोविड-19 बाबतचा आमचा दृष्टीकोन
Uber वापरणार्या प्रत्येकाची सुरक्षितता आणि आरोग्य हे आम्ही करत असलेल्या कामात केंद्रस्थानी असते. आमच्या'वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध करणे, आमच्या प्लॅटफॉर्मवरून कमाई करत असलेल्यांना सहाय्य करणे आणि आमच्या शहरांना सेवा देणार्या भागीदारी आणि पुढाकारांसह कोविड-19 साठी आमचा प्रतिसाद वाढवणे पुढे चालू ठेवत आहोत.
मदत करण्यास वचनबद्ध
आम्ही जगभरातील आघाडीवरील आरोग्यसेवा कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, आणि गरजू लोकांसाठी 1 कोटी विनामूल्य राईड्स आणि खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करण्याची शपथ घेत आहोत.
आरोग्यसेवा कामगारांना मदत करणे
आघाडीवर राहून काम करत असलेल्या आरोग्यसेवा कर्मचार्यांना रुग्णांच्या घरी तसेच आरोग्यसेवा सुविधास्थळांच्या दरम्यान ये-जा करण्यात मदत करण्यासाठी Uber मोफत वाहतूक सुविधा पुरवत आहे."
प्रथम प्रतिसाद देणारे
ज्या बाजारपेठांमध्ये Uber Eats उपलब्ध आहे, तेथे आम्ही प्रथम प्रतिसाद देणारे आणि आर ोग्यसेवा कर्मचार्यांना स्थानिक सरकारांच्या समन्वयाने मोफत जेवण उपलब्ध करुन देत आहोत.
स्थानिक रेस्टॉरंट्सला समर्थन देत आहे
काही भागात आम्ही Uber Eats* वरील स्वतंत्र रेस्टॉरंट्ससाठी डिलिव्हरी फी माफ केली आहेे
वस्तू पुरवठा वाहतूक करणे
ज्या बाजारपेठांमध्ये Uber Freight कार्यरत आहे, तेथे महत्त्वपूर्ण वस्तू असलेल्या मालाची वाहतूक शून्य नफा किंमतीसह केली जाईल.
सार्वजनिक प्राधिकरणास समर्थन देणे
Uber वापरणार्या प्रत्येकाची सुरक्षितता आणि आरोग्य यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. सरकारी प्राधिकरण आणि शहरे कोविड-19 साथ रोखण्यासाठी कार्यरत असताना त्यांना सहाय्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांसाठी महत्त्वाची माहिती*
- तुमच्या कारसाठी स्वच्छतेच्या वस्तूंचा पुरवठा
आम्ही ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी भागीदार यांना त्यांच्या कार स्वच्छ ठेवण्यास मदत करण्यासाठी जंतुनाशके मिळण्याचा पर्याय उपलब्ध असावा यावर काम करत आहोत. पुरवठा फारच मर्यादित आहे, म्हणून आम्ही सर्वात जास्त गरज असलेल्या शहरांमध्ये* ड्रायव्हर आणि डिलिव्हरी भागीदारांना संसाधने देण्यास प्राधान्य देत आहोत.
- “दाराजवळ ठेवा” डिलिव्हरी
Down Small ज्या बाजारांमध्ये Uber Eats उपलब्ध आहे तिथे ग्राहकांना पर्याय निवडण्यास हे उपलब्ध आहे 'त्यांना त्यांची डिलिव्हरी कशी केलेली आवडेल हे ठरवण्यासाठी "दारापाशी ठेवा" चेकआऊट दरम्यान
- सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना साहाय्य करणे
Down Small साथीच्या रोगाला प्रत्युत्तर देण्यात सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना सहाय्य करण्यासाठी आमची टीम 24/7 उपलब्ध आहे. त्यांच्यासह काम करून, आम्ही कोविड-19 चा संसर्ग किंवा बाधा झाल्याची खात्री झालेल्या रायडर्स किंवा ड्रायव्हर्सची खाती तात्पुरती निलंबित करू. आमचे प्रयत्न वैद्यकीय सल्ल्यावर आधारित असण्याची खात्री करण्यासाठी आम्ही साथीच्या रोग विशेषज्ञाबरोबर सल्लामसलत करत आहोत. - तुम्ही ड्रायव्हिंग करणे थांबवल्यास सहाय्य
Down Small कोणत्याही ड्रायव्हरला किंवा डिलिव्ह री करणार्या व्यक्तीला कोविड-19 चे निदान झाल्यास किंवा सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाने त्यांंना इतरांपासून दूर राहण्यास सांगितल्यास, त्यांचे खाते निलंबित ठेवलेले असताना 14 दिवसांपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळेल. आम्ही काही बाधित क्षेत्रांमधील ड्रायव्हर्सना याआधीच मदत केली आहे आणि हे मदतकार्य जगभरात त्वरित लागू व्हावे यासाठी आम्ही काम करत आहोत.
- Uber Pro ऑफर करणाऱ्या मार्केट्समध्ये आम्ही तुमची स्थिती राखून ठेवत आहोत
Down Small तुम्ही तुमची Uber Pro स्थिती गमावण्याची अजिबात चिंता करू नका. या उर्वरित पात्र कालावधीसाठी आम्ही सर्व ड्रायव्हर्ससाठी सध्याची Uber Pro स्थिती कायम राखत आहोत.
- तुम्ही चालविण्यासाठी वाहन भाड्याने घेतल्यास सहाय्यकाशी संपर्क करा
Down Small जर तुम्ही ' भाड्याने वाहन सेवा देऊ करणार्या बाजारात असाल तर, कोविड ‑ 19 चे निदान झालेले किंवा वैयक्तिकरित्या अलग ठेवण्यात आलेले कोणतेही ड्रायव्हर कोणत्याही दंडाशिव ाय आपली कार परत देऊ शकतील अशी खात्रीशीर व्यवस्था आम्ही आमच्या भाड्याने गाडी देणार्या जागतिक भागीदारांसह केलेली आहे. काही भागांमध्ये, भाड्याने गाडी देणारे भागीदार भाड्याची कार परत करू इच्छित असलेल्या कोणत्याही ड्रायव्हरला दंड न आकारता तसे करण्याची अनुमती देतील.
आरोग्य आणि सुरक्षितता सूचना
सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याची आठवण आम्ही Uber वापरणार्या प्रत्येकाला करत आहोत. जर तुम्ही आजारी असाल तर, घरीच राहा आणि इतरांपासून दूर राहा. तुमचे हात वारंवार धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना झाकून घ्या. अधिक माहितीसाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटला भेट द्या
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणारे लोक*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्हाला आजारी आहोत असे वाटत असेल तर गाडी चालवू नका किंवा खाद्यपदार्थ डिलिव्हर करू नका*.
आपण आत्ता करू शकतो अशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्य असल्यास घरी रहाणे.
तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटत असेल तर हे आणखीच आवश्यक आहे. ह्यामुळे विषाणूचा प्रसार मर्यादित करण्यात मदत होईल. ड्रायव्हर्सना सुरक्षित ठेवण्यात आणि ज्यांना राइड्सची आवश्यकता आहे त्यांना त्या उपलब्ध असतील याची खातरजमा करण्यात मदत करुया.
जर तुम्ही गाडी चालवत असाल तर:
- तुमचे तोंड आणि नाक झाकून घ्या . जर तुम्हाला शिंक किंवा खोकला आला तर तुमच्या कोपराचा किंवा रुमालाचा वापर करा.
- रायडर्सना अंतर राखायला सांगा. तुम्हाला जास्त जागा मिळावी म्हणून तुमच्या रायडर्सना मागच्या सीटवर बसायला सांगण्यात हरकत नाही.
- खिडक्या उघडा. शक्य असल्यास, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांच्या काचा खाली करा.
जर तुम्ही डिलिव्हरी करत असाल तर:
दारापाशी ठेवून जा: जर Eats ग्राहकाने विनंती केली तर, संपर्क कमी करण्यात मद त होण्यासाठी कृपया डिलिव्हरी दारावर ठेवून जा. तुमचे हात धुवा: कृपया आपले हात धुवा किंवा शक्य तितक्या वेळा हात स्वच्छ करणारे वापरा.
उबर ग्राहक
शक्य असल्यास घरीच रहा
आपण आत्ता करू शकतो अशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्य असल्यास घरी रहाणे.
तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटत असेल तर हे आणखीच आवश्यक आहे. ह्यामुळे विषाणूचा प्रसार मर्यादित करण्यात मदत होईल. ड्रायव्हर्सना सुरक्षित ठेवण्यात आणि ज्यांना राइड्सची आवश्यकता आहे त्यांना त्या उपलब्ध असतील याची खातरजमा करण्यात मदत करुया.
राइड्स घेताना
- तुमचे हात धुवून घ्या. तुमच्या राईडच्या आधी आणि नंतर.
- तुमचे तोंड आणि नाक झाकून घ्या. जर तुम्हाला शिंक किंवा खोकला आला तर तुमच्या कोपराचा किंवा रुमालाचा वापर करा.
- मागे बसा. मागच्या सीटवर बसून तुमच्या ड्रायव्हरला स्पेस द्या.
- खिडकी उघडा. शक्य असल्यास, हवा खेळती राहण्यासाठी खिडकीची काच पूर्ण खाली घ्या.
Uber Eats द्वारे ऑर्डर देताना
- दारात सोडण्य ाची विनंती करा. अॅपमध्ये “दारापाशी ठेवून जा" निवडा किंवा तुमची प्राधान्ये सांगण्यासाठी डिलिव्हरी सूचना वापरा. आपण 30 मिनिटांत उपलब्ध असाल याची खात्री करा. तुमचे हात धुवा: विशेषत: तुमची खाद्यपदार्थाची ऑर्डर मिळाल्यानंतर आणि ते तुम्ही खाण्यापूर्वी.
तुमचा ड्रायव्हर आणि डिलिव्हरी देणार्या व्यक्तीला टिप द्या.*
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी देणारे लोक सध्या खूप जास्त कष्ट करत आहेत, तुमच्या समुदायाला सहाय्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचे काम करत आहेत. तुम्हाला त्याची कदर आहे हे कृपया टिप देऊन दाखवा - थोडा दयाळूपणा खूप कामाचा ठरू शकतो.
तुम्ही गेल्या 30 दिवसांमधील कोणत्याही Uber राईडमध्ये किंवा Uber Eats डिलिव्हरीसाठी एक टिप जोडू शकता. तुमच्या अॅपमध्ये खाते इतिहास मध्ये जा आणि तुम्हाला ज्या राइड्स आणि डिलिव्हरीज करता टिप द्यायला आवडेल त्या निवडा.
आम्ही उचलत असलेली पावले
सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना साहाय्य करणे
प्रभावित वाहनचालकांना मदत करणे
कोणत्याही ड्रायव्हरला किंवा डिलिव्हरी करणार्या व्यक्तीस कोविड-19 चे निदान झाल्यास किंवा सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांनी त्यांना इतरांपासून दूर राहण्यास सांगितल्यास, त्यांचे खाते होल्डवर असताना 14 दिवसांपर्यंत त्य ांना आर्थिक मदत मिळेल. आम्ही काही बाधित क्षेत्रांमधील ड्रायव्हर्सना याआधीच मदत केली आहे आणि हे जगभरात त्वरित लागू करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
कार स्वच्छ ठेवण्यास मदत करणे
आम्ही ड्रायव्हरना त्यांच्या कार स्वच्छ ठेवण्यास मदत करण्यासाठी जंतुनाशक औषध पुरवण्याचे कार्य करीत आहोत. वस्तूंचा पुरवठा खूप मर्यादित आहे, परंतु आम्ही शक्य तितके पुरवण्यासाठी वस्तुनिर्माते आणि वितरक यांच्यासह भागीदारी करत आहोत. सर्वात जास्त गरज असलेल्या शहरांमधील ड्रायव्हर्सना वितरित करण्यास आमचे प्राधान्य असेल.
आमच्या समुदाय मार्गदर्शकतत्त्वांचे समर्थन
सध्याच्या परिस्थितीशी जुळणारे भेदभावाचे अहवाल आलेले आहेत. हे कधीही ठीक नाही - प्रत्येक रायडर आणि ड्रायव्हरने Uber समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे अपेक्षित आहे, जे स्पष्टपणे भेदभावास प्रतिबंधित करते.
चालकांसाठी महत्वाची माहिती
तुमच्या कारसाठी स्वच्छतेच्या वस्तूंचा पुरवठा
तुमची कार स्वच्छ ठेवण्यात तुम्हाला मदत होण्यासाठी आम्ही ड्रायव्हर्सना जंतुनाशके पुरवण्याचे काम करत आहोत. वस्तूंचा पुरवठा खूप मर्यादित आहे, परंतु आम्ही शक्य तितके पुरवण्यासाठी वस्तुनिर्माते आणि वितरक यांच्यासह भागीदारी करत आहोत. सर्वात जास्त गरज असलेल्या शहरांमधील ड्रायव्हर्सना वितरित करण्यास आमचे प्राधान् य असेल.
सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना साहाय्य करणे
तुम्ही ड्रायव्हिंग करणे थांबवल्यास सहाय्य
कोणत्याही ड्रायव्हरला किंवा डिलिव्हरी करणार्या व्यक्तीस कोविड-19 चे निदान झाल्यास किंवा सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांनी त्यांना इतरांपासून दूर राहण्यास सांगितल्यास, त्यांचे खाते होल्डवर असताना 14 दिवसांपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळेल. आम्ही काही बाधित क्षेत्रांमधील ड्रायव्हर्सना याआधीच मदत केली आहे आणि हे जगभरात त्वरित लागू करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
तुमची Uber Pro स्थित ी कायम राखणे
तुम्ही तुमची Uber Pro स्थिती गमावण्याची अजिबात चिंता करू नका. या उर्वरित पात्र कालावधीसाठी आम्ही सर्व ड्रायव्हर्ससाठी Uber Pro स्थिती कायम राखत आहोत.
याच्या विषयी