Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कायद्याचे पालन करा

हा विभाग कायदे आणि नियमांवर आधारित आहे ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. उदाहरणार्थ, कोणताही गुन्हा करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी Uber ऍप्सचा वापर करण्‍यास मनाई आहे.

कार सीट्स

शिशु आणि लहान मुलांसह प्रवास करताना ड्रायव्हर आणि रायडर्सनी स्थानिक कायद्यांचे पालन केले पाहिजे. मुलांसह राईड घेत असताना, योग्य आणि अनुकूल कार सीट प्रदान करणे ही खाते धारकाची 'जबाबदारी आहे. 12 व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांनी मागील सीटवर बसून प्रवास करावा.

  • लहान मुलांसह राईड घेताना, कार सीट देणे ही तुमची जबाबदारी आहे. कारमध्‍ये सीट आवश्‍यक असणार्‍या मुलांना संपूर्ण राईडमध्‍ये सीट बेल्ट लावून ठेवा त्यांना मांडीत घेऊन बसू नका. लक्षात असू द्या, सर्व कार्सच्या सीट्स सर्व कार्समध्ये एकसारख्‍या नसतात, म्हणूनच तुमच्याकडे योग्य कार सीट नसल्यास किंवा तुम्हाला कारमध्ये बसविण्यास ड्रायव्हर्सना सोयीचे वाटत नसल्यास अद्यापही ते राईड नाकारू शकतात.

  • लहान मुलांसह प्रवास करणार्‍या रायडर्सना पिकअप करत असताना, गाडी चालवण्यापूर्वी कार सीट व्यवस्थित बसवण्यासाठी त्यांना जास्तीचा वेळ द्या. त्यांच्याकडे योग्य कार सीट नसल्यास किंवा तुमच्या कारमध्ये ती बसवणे तुम्हाला सोयीस्कर वाटत नसल्यास, तुम्ही राईड रद्द करू शकता. लक्षात असू द्या की या आधारावर ट्रिप्स नाकारणे किंवा रद्द करणे याचा तुमच्या ड्रायव्हर रेटिंगवर परिणाम होणार नाही.

सर्व कायद्यांचे पालन करा

तुम्ही Uber अ‍ॅप्स वापरताना नेहमीच संबंधित स्थानिक कायद्यांची माहित करून घेण्यास आणि त्यांचे पालन करण्‍यास जबाबदार आहात या नियमांमध्‍ये तुम्ही विमानतळावर असताना विमानतळाचे नियम आणि रस्तयावर असताना वाहनांची गती आणि रहदारीच्या नियमांचा समावेश होतो.

  • सर्व संबंधित परवाने, परवानग्या आणि ड्रायव्हर्ससाठी आवश्यक असलेली कोणतेही इतर कायदेशीर दस्तऐवज अद्ययावत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ड्रायव्हरचा वैध परवाना बाळगणे, विमा आणि वाहन नोंदणी करणे हे कायद्यानुसार सर्व ड्रायव्हर्ससाठी आवश्यक आहे. राइडशेअरिंगसाठी, यात तुमच्या क्षेत्रातील राइडशेअरसाठी किंवा भाड्याने घेतलेल्या ड्रायव्हर्ससाठी लागू असलेल्या नियामक आवश्यकतांची पूर्तता करणे समाविष्ट आहे.

    ट्रिप दरम्यान होणारी वाहनांची टक्कर आणि वाहतुकीच्या उद्धरणांच्या अहवालांचे आम्ही पुनरावलोकन करतो. रायडर्सच्या येण्याची वाट पहात असताना तुम्ही तुमचे वाहन कुठे पार्क करू शकता यावर पार्किंगबाबतचे स्थानिक नियम निर्बंध घालतात. उदाहरणार्थ, बाइक लेनमध्ये थांबणे किंवा ऍक्सेसीबिलिटी रॅम्प अवरोधित करणे यामुळे कायद्याचे उल्लंघन होऊ शकते.

  • प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या ड्रायव्हरला गाडी चालवू द्या. स्टीयरिंग व्हीलला स्पर्श करू नका, उदाहरणार्थ, आणि गीअर शिफ्ट किंवा वाहन चालविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर नॉब, बटणे किंवा घटकांसह छेडछाड करू नका. 'ड्रायव्हरला वेग वाढविण्यासाठी किंवा बेकायदेशीरपणे थांबण्‍यासाठी, अयोग्यरित्या पोहोचवण्यासाठी किंवा डावपेच करण्यास सांगू नका.

  • बाइक किंवा स्कूटर चालविताना किंवा पार्किंग करताना, स्थानिक कायदे आणि नियम लक्षात ठेवा; तुम्ही लागू असलेल्या कायद्यांसाठी तुमच्या शहरातील शासनाची वेबसाइट तपासू शकता. रस्त्याच्या स्थानिक नियमांचे पालन करण्यासाठी, तुम्ही सामान्यत: पादचार्‍यांना जागा देणे, वाहतुकीच्या दिशेने गाडी चालविणे, दिशा बदलण्याचा विचार करत असाल तर सिग्नल देणे आणि सिग्नलवर लाल दिवा दिसताच आणि थांबा चिन्ह दिसल्यावर थांबणे आवश्यक असते.

सेवा देणारे प्राणी

स्थानिक कायद्यांनुसार ड्राइव्हर्सनी अशा कोणत्याही रायडर्सना राइड्स द्याव्यात ज्या रायडर्ससोबत सेवा देणारे प्राणी आहेत. ड्रायव्हरला एलर्जी असली, त्याला धार्मिक बाबतीत काही आक्षेप असले किंवा प्राण्यांची भीती वाटत असली तरीदेखील, रायडरसोबत असणार्‍या सेवा देणार्‍या प्राण्यांमुळे रायडरला ट्रिप नाकारल्यामुळे Uber अ‍ॅप्स मधील ऍक्सेस गमावला जाऊ शकतो.

  • रायडर सेवा देणार्‍या प्राण्याबरोबर प्रवास करत आहे या कारणासाठी तुम्ही ट्रिप नाकारू शकत नाही.

  • राईडमध्ये तुमच्यासोबत सेवा देणारा प्राणी आहे म्हणून तुमचा ड्रायव्हर वाहतूक करण्यास नकार देऊ शकत नाही. 'राईडमध्ये तुमच्यासोबतचा प्राणी ' सेवा देणारा प्राणी नसल्यास, 'तुमच्या ड्रायव्हरशी संपर्क करून प्रवासात तुमच्यासोबत पाळीव प्राणी आहे हे सांगणे हा एक चांगला शिष्टाचार आहे. सेवा देणारे प्राणी नसलेल्या पाळीव प्राण्यांची वाहतूक करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार ड्रायव्हर्सना असतो.

अंमली पदार्थ आणि मद्य

Uber अ‍ॅप्स वापरत असताना अंमली पदार्थांचा वापर आणि मद्याचे खुले कंटेनर्स यांस कधीही अनुमती दिली जात नाही.

  • कधीही कारमध्ये बेकायदेशीर औषधे किंवा मद्याचे खुले कंटेनर आणू नका. ड्रायव्हर अंमली पदार्थ किंवा मद्याच्या प्रभावाखाली आहे असे तुम्हाला कधीही जाणवल्यास, ड्रायव्हरला ट्रिप त्वरित समाप्त करण्यास सांगा. त्यानंतर कारमधून बाहेर पडा आणि तुमच्या स्थानिक अधिकार्‍यांना किंवा आपत्कालीन सेवांना कॉल करा. तुम्ही वाहनातून बाहेर पडल्यानंतर, कृपया Uber ला तुमच्या अनुभवाचा रिपोर्ट द्या.

  • कायद्यानुसार, तुम्ही नशेत असताना गाडी चालवू शकत नाही. दारू, ड्रग्स किंवा वाहन सुरक्षितपणे चालवण्‍याच्या क्षमतेस बाधा आणणार्‍या अन्य कोणत्याही पदार्थांच्या प्रभावाखाली असताना वाहन चालविण्यास कायदा प्रतिबंध करतो. तुमच्याकडे अत्यंत नशेत असलेला किंवा भांडण करणारा रायडर आला तर, तुमच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ट्रिप नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. रायडर्सनी ट्रिपमध्ये अल्कोहोलचे खुले कंटेनर्स नेऊ नये किंवा ड्रग्स घेऊ नये. तुमच्याकडे अत्यंत नशेत असलेला किंवा भांडण करणारा रायडर आला तर, तुमच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ट्रिप नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

  • बाइक किंवा स्कूटर सुरक्षितपणे चालवण्याची क्षमता कमी करणार्‍या दारू, ड्रग्स किंवा अन्य कोणत्याही पदार्थाच्या प्रभावाखाली कधीही राईड करू नका.

बंदुक आणि शस्त्रे

रायडर्स आणि त्यांचे अतिथी, तसेच ड्राइव्हर्स् यांना लागू कायद्यानुसार परवानगी मिळालेल्या मर्यादेव्यतिरिक्त Uber ऍप वापरताना बंदुक किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.

फसवणूक

फसवणूक करण्‍यामुळे विश्वास गमावला जाऊ शकतो आणि ते धोकादायक देखील असू शकते. साइन इन करताना किंवा सुरक्षिततेच्या तपासणीत असताना, हेतुपुरस्सर खोटी माहिती सांगणे किंवा एखाद्याची 'ओळख गृहित धरणे, यास परवानगी नाही.

एखाद्या घटनेची तक्रार करताना, तुमची Uber खाती तयार करताना आणि त्यात ऍक्सेस करताना, चार्जेस किंवा शुल्काबाबतीत विवाद असताना आणि क्रेडिट्सची विनंती करताना अचूक माहिती द्या. तुम्ही ज्यासाठी पात्र आहात केवळ अशा फी किंवा परताव्याची विनंती करा आणि केवळ हेतूनुसार ऑफर आणि प्रोमो वापरा. जाणूनबुजून अवैध व्यवहार पूर्ण करू नका.

स्ट्रीट हेल्स

प्रत्येक अनुभवाची सुरक्षितता वाढविण्यासाठी, ऑफ-अॅप निवड करणे प्रतिबंधित आहे. Uber अ‍ॅप्स वापरताना कायद्यानुसार स्ट्रीट हेलिंगला प्रतिबंध आहे, म्हणून Uber सिस्टमच्या बाहेर कधीही देय मागू नका किंवा स्वीकारू नका. Uber ने सुलभ केलेले पेमेंट पर्याय जोपर्यंत रायडर वापरत नाही तोपर्यंत, Uber सिस्टममध्‍ये समावेश नसलेले देय ड्रायव्हर्सनी मागू नये किंवा स्वीकारू नये.

इतर अस्वीकार्य क्रिया

परवानगीशिवाय Uber चा ट्रेडमार्क किंवा बौद्धिक मालमत्ता वापरण्यासारख्या गोष्टी करून व्यवसायाला किंवा ब्रँडला कधीही नुकसान पोहचवू नका.

कोणत्याही Uber खात्याचा वापर बेकायदेशीर, भेदभाववादी, द्वेषपूर्ण किंवा लैंगिक सुस्पष्ट क्रियाकलापांचा भाग म्हणून Uber ऍप्सवर राईड, बाइक किंवा स्कूटर ट्रिप्स, परिवहन यांची व्यवस्था करण्यासाठी आणि त्याकरिता पैसे देण्यासाठी किंवा त्यांच्या वापराची जाहिरात करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

  • ड्रायव्हर्सनी केवळ Uber कडून मिळालेल्या Uber ब्रांडेड आयटम्सचा वापर करावा. अनधिकृत किंवा तृतीय-पक्षाच्या वस्तूंचा वापर केल्यामुळे जसे की—दिवे, फलक, चिन्हे किंवा Uber चे नाव किंवा ट्रेडमार्क असलेले समान आयटम्स—रायडर्सचा गोंधळ होऊ शकतो.

आणखी समुदाय मार्गदर्शक तत्त्वे पहा

प्रत्येकाशी आदराने वागा

एकमेकांना सुरक्षित ठेवण्यास मदत करा