सुरक्षेबद्दल आमची वचनबद्धता
तुम्हाला मोकळेपणाने फिरता यावे, तुमच्या वेळेचा सदुपयोग करता यावा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी आणि स्थळांशी तुम्हाला कनेक्टेड राहता यावे हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच चुकीचे प्रसंग कमी करण्याच्या उद्देशाने, आम्ही नवीन स्टॅंडर्ड्स तयार करण्यापासून ते तंत्रज्ञान विकसित करण्यापर्यंत सर्व उपायांद्वारे सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत.
तुमचा अनुभव कशा प्रकारे सुरक्षित केला जातो
ॲपमधील सुरक्षा वैशिष्ट्ये
तुमच्या ट्रिपचे तपशील तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा. राईड दरम्यान तुमच्या ट्रिपवर नजर ठेवा. आमच्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही शांत मनाने प्रवास करू शकता.
एकीकृत समुदाय
लाखो राइडर्स आणि ड्राइवर्स समुदाय मार्गदर्शकतत्त्वांचा एक संच आपसात शेअर करतात व त्याद्वारे योग्य कृती करण्यासाठी एकमेकांना जबाबदार राहतात.
प्रत्येक गोष्टीत सहाय्य
एक खास प्रशिक्षित टीम 24/7 उपलब्ध आहे. ॲपमधून दिवसा आणि रात्री कधीही, कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सुरक्षा संबंधी चिंतेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा.