त्याच दिवसाच्या डिलिव्हरीसाठी Uber पॅकेज वापरा
थेट Uber अॅपमध्ये सोयीस्करपणे पॅकेजेस पाठवा.
मदत पोहोचत आहे
Uber पॅकेज हा एक सोपा डिलिव्हरी उपाय आहे ज्यामुळे लोक त्याच दिवशी आयटम्स पाठवू शकतात, मग ते एखाद्या प्रिय व्यक्तीसाठीचे केअर पॅकेज, मित्राच्या वाढदिवसाचा गिफ्ट, ऑनलाइन विकलेली आयटम किंवा एखादे व्यवसायाचे डॉक्युमेंट असो.
तुमच्या ग्राहकांना आनंद द्या
तुम्ही कपडे विकत असा शॅम्पू किंवा ताजे बेक केलेले केक, तुमच्या व्यवसाय आता त्याच-दिवशी डिलिव्हर करण्याची ऑफर देऊ शकतो.
मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट व्हा
Uber ॲप शेवटच्या क्षणी वाढदिवसाच्या भेटवस्तू किंवा तुमच्या विसरलेल्या चाव्यांसाठी नवीन डिलिव्हरी उपाय प्रदान करण्यात मदत करते, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण शहर फिरावे लागत नाही.
तुमचा व्यवसाय चालवा
कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी साइट्स किंवा ऑफिसेसच्या दरम्यान कागदपत्रे, पुरवठा आणि उपकरणे हस्तांतरित करा.
Uber पॅकेज कसे काम करते
Uber ॲपमध्ये पॅकेज निवडा.
ड्रायव्हरला भेटा आणि तुमचे पॅकेज मार्गस्थ करा.
ॲपमधील ट्रॅकिंग वापरून तपासत रहा.
Uber पॅकेज वापरण्याचे फायदे
उपलब्धता
तुम्ही जितक्या सहजपणे राईडची विनंती करता त्याच पद्धतीने तुम्ही डिलिव्हरी बुक करू शकता.
वेग
मागणीनुसार डिलिव्हरी मिळवा, सहसा तासाभरात.
ट्रॅकिंग
तुमचा आयटम प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत असताना ते पहा आणि तो डिलिव्हर झाल्यावर सूचना मिळवा.
लवचिकता
सामान्यत:,जर ते बॅकपॅकमध्ये सहजपणे बसत असल्यास, तर ते Uber पॅकेजसह जाऊ शकते.¹ आणि निवडक लोकेशन्सवर, तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करणारी डिलिव्हरी पद्धत आणि वाहन प्रकार निवडू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- Uber पॅकेज म्हणजे काय?
Uber पॅकेज हा एक पर्याय आहे जो तुम्हाला ड्रायव्हरला तुमची पॅकेज(जेस) नियुक्त केलेल्या ड्रॉपऑफ लोकेशनवर वाट पाहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची विनंती करू शकतो.
तुम्ही नियुक्त केलेल्या प्रेषकाकडून तुम्हाला पॅकेज पाठवले जाण्याची विनंती देखील करू शकता.
- मला काय करावे लागेल?
Down Small Uber ॲप होमस्क्रीनवरील पॅकेज चिन्हावर टॅप करा आणि ॲपमधील सूचनांचे पालन करा.
- मी काय पाठवू शकतो?
Down Small Uber पॅकेज वापरून पाठवलेल्या पॅकेजेससाठी प्रति वाहन प्रकारानुसार विशिष्ट आर्थिक मूल्य मर्यादा आणि वजनाच्या मर्यादा असतात. प्रतिबंधित आयटम्समध्ये अल्कोहोल, औषधे, अमली पदार्थ आणि धोकादायक किंवा बेकायदेशीर आयटम्सचा समावेश आहे परंतु ते त्यापुरते मर्यादित नाहीत.²
वाहनाद्वारे डिलिव्हरीसाठी, तुम्ही अशी पॅकेजेस पाठवू शकता:
- ज्यात कोणतेही प्रतिबंधित आयटम्स समाविष्ट नाहीत²
- जी मध्यम आकाराच्या वाहनाच्या डिकीमध्ये सहजपणे ठेवता येतील
- जी बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केलेली आहेत आणि गाडीवर किंवा दारावर पिकअपसाठी तयार आहेत
- जी तुमच्या लोकेशनसाठी आर्थिक मूल्य आणि वजनाच्या मर्यादेत आहेत¹
बाइक किंवा स्कूटरद्वारे डिलिव्हरीसाठी, तुमच्या लोकेशनवर उपलब्ध असल्यास, तुम्ही अशी पॅकेजेस पाठवू शकता:
- ज्यात कोणतेही प्रतिबंधित आयटम्स समाविष्ट नाहीत²
- जी बॅकपॅकमध्ये सहजपणे ठेवता येतात
- जी बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केलेली आहेत आणि गाडीवर किंवा दारावर पिकअपसाठी तयार आहेत
- जी तुमच्या लोकेशनसाठी आर्थिक मूल्य आणि वजनाच्या मर्यादेत आहेत¹
तुमच्या पॅकेजमध्ये प्रतिबंधित आयटम असल्यास किंवा वरील निर्बंधांचे पालन न केल्यास, ड्रायव्हर तुमची विनंती रद्द करू शकतो.
- मी माझे पॅकेज कुठे पाठवू शकतो?
Down Small Uber पॅकेज हे स्थानिक, विशेषत: एकाच भौगोलिक क्षेत्रामधील (आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणे वगळून) डिलिव्हरीसाठी डिझाइन केलेले आहे.
- प्राप्तकर्त्याला काय करावे लागेल?
Down Small पॅकेज प्राप्तकर्ता ड्रायव्हरला दारात किंवा पदपथावर भेटण्यासाठी उपलब्ध असावा. जर तुम्हाला ड्रायव्हरला पॅकेज प्राप्तकर्त्याच्या दारात ठेवायला सांगायचे असेल, तर तुम्ही डिलिव्हरी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणखी सूचनांसह डिलिव्हरी नोट्स जोडू शकाल.
- डिलिव्हरी दरम्यान आयटम खराब झाल्यास काय होते?
Down Small Uber पॅकेजचे नुकसान, चोरी किंवा तृतीय पक्षाद्वारे झालेल्या हानीसाठी विमा संरक्षण देत नाही. कृपया संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटी पहा. नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्यास तुमचे खाते कोणत्याही सूचनेशिवाय निष्क्रिय केले जाऊ शकते.
- मी एखाद्या व्यक्तीला सरप्राइझ म्हणून पॅकेज पाठवू शकतो का?
Down Small आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही डिलिव्हरीच्या प्राप्तकर्त्याला सूचित करावे म्हणजे ते वाहनातून पॅकेज घेण्यासाठी ड्रायव्हरला भेटू शकतील. तुम्ही एखाद्याला सरप्राइझ म्हणून पॅकेज पाठवले असल्यास, तुम्हाला ड्रायव्हरला, Uber ॲपच्या मेसेज विभागात, पॅकेज प्राप्तकर्त्याच्या दारात ठेवण्याची स्पष्ट सूचना द्यावी लागेल. ड्रायव्हर ही विनंती कधीही नाकारू शकतो.
- मला पॅकेज डिलिव्हरी करताना समस्या असल्यास काय?
Down Small - तुमचे पॅकेज अद्याप डिलिव्हर झाले नसल्यास, तुम्ही ॲपमध्ये ड्रायव्हरला कॉल करू शकता किंवा मेसेज पाठवू शकता.
- ड्रायव्हर्स कोणत्याही कारणास्तव तुमची विनंती रद्द करण्यास मोकळे आहेत, उदाहरणार्थ, तुमचे पॅकेज खूप जड असल्यास, त्यांच्या वाहनासाठी खूप मोठे असल्यास, सुरक्षितपणे पॅकिंग केलेले नसल्यास किंवा त्यात प्रतिबंधित वस्तू असल्यास.
- पॅकेज प्राप्त करणारी व्यक्ती उपलब्ध नसल्यास, ड्रायव्हर समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा परत देण्याकरता समन्वय साधण्यासाठी ॲपमध्ये तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो. आवश्यक असल्यास तुम्हाला पॅकेज परत करण्याशी संबंधित खर्चासाठी तुम्ही जबाबदार असाल.
- जर तुम्हाला तुमचे पॅकेज अद्याप मिळाले नसेल किंवा डिलिव्हरी दरम्यान पॅकेज खराब झाले असेल तर, संपुष्टात आलेल्या ट्रिप्स किंवा रद्द केलेल्या विनंत्यांच्या बाबतीत डिलिव्हरीमध्ये समन्वय साधण्यात मदतीसाठी, Uber सहाय्याशी संपर्क साधा.
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
सर्व लोकेशन्सवर उपलब्ध नाही. उपलब्धतेसाठी Uber ॲप तपासा.
¹ Uber पॅकेज वापरून पाठवलेल्या पॅकेजेससाठी प्रति वाहन प्रकारानुसार विशिष्ट आर्थिक मूल्य मर्यादा आणि वजनाच्या मर्यादा असतात. कृपया तुमच्या लोकेशनसाठी लागू असलेल्या निर्बंधांच्या संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटीपहा.
² पाठवलेले आयटम्स वैध आणि कायदेशीर आहेत आणि त्या पुढील गोष्टींशी संबंधित नाहीत, परंतु तेवढ्यापुरता मर्यादित नाहीत: अल्कोहोल, तंबाखू, शस्त्रे, बेकायदेशीर/चोरी केलेल्या वस्तू, अमली पदार्थ, बार्बिच्युरेट्स, घातक सामग्री (उदाहरणार्थ: ज्वलनशील, विषारी, स्फोटक), प्राणी, नियमन केलेल्या प्रजाती, पैसे, गिफ्ट कार्ड्स, मौल्यवान आयटम्स, दागिने आणि घरपोच औषधे यांसोबतच कायद्याने परवानगी नसलेल्या इतर गोष्टींसह. कृपया संपूर्ण तपशीलांसाठी नियम आणि अटी पहा.
प्रकटीकरण: Uber पॅकेज वापरून, तुम्ही मान्य आणि स्वीकार करता की हे वैशिष्ट्य तुम्हाला Uber ॲपद्वारे ट्रिप्सची विनंती करण्यास सक्षम करते जेणेकरून Uber प्लॅटफॉर्म वापरणारे ड्रायव्हर्स वस्तूची डिलिव्हरी करू शकतील. तुम्ही मान्य करता की हे वैशिष्ट्य तात्पुरते असू शकते. Uber किंवा ड्रायव्हर्स दोघेही पॅकेज(जेस)साठी किंवा पॅकेज(जेस)च्या सामग्रीसाठी जबाबदार नाहीत, म्हणून ते पॅकेज(जेस), त्यातील सामग्री आणि/किंवा डिलिव्हरी यांच्याशी संबंधित पॅकेज(जेस)चे कोणतेही नुकसान किंवा नुकसान झालेला माल यांसह कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी नाकारतात. Uber पॅकेजचे नुकसान, चोरी किंवा तृतीय पक्षाद्वारे नुकसान झालेल्या मालासाठी विमा संरक्षण देत नाही. कृपया संपूर्ण तपशीलांसाठी नियम आणि अटी पहा.