Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

आम्हाला माहीत आहे की शतकानुशतके—सुरक्षित ठिकाणे, अधिक चांगले पर्याय, आरोग्यसेवा, कामाच्या संधी, समान हक्क—या सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या शक्यता असमान राहिल्या आहेत. आजही एका ठिकाणावरून दुसरीकडे हालचाल हा काही जणांचा विशेषाधिकार आहे, सर्वांचा हक्क नाही.

पण हे असे असणे गरजेचे नाही. आमचा असा विश्वास आहे की एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी हालचाल ही मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी एक मोठी शक्ती असू शकते. Uber ची सुरुवात झाल्यापासून आम्ही हे पुनःपुन्हा सिद्ध केले आहे. आता, कोविड आणि त्याचा जगभरातील असमानतांवर अधिकच भयावह प्रभाव जाणवत असताना, ही वेळ आहे आमच्या महत्त्वाकांक्षेबद्दल स्पष्ट असण्याची: सर्वांसाठी हालचाल समान करणे.

याचा आमच्या मूळ मिशनशी थेट संबंध आहे: जगाची हालचाल ते आणखी चांगले होण्याकरता कशी होईल, यासाठीच्या उपायांची आम्ही सतत, अथकपणे नव्याने कल्पना करत असतो. हे करून, आम्ही हालचाल करणे शक्य करतो. आम्ही लोकांना सोयीस्कर काम शोधण्यासाठी सक्षम करतो. आम्ही व्यवसायांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करतो. आम्ही आवश्यक वस्तू ट्रक भरभरून एका जागेहून दुसऱ्या जागी पोहचवतो.

आम्हाला गोष्टी नेहमीच योग्य पद्धतीने जमल्या, असे नाही. पण आम्ही लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी एका अधिक चांगल्या दिशेने पुढे जात राहण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या जागतिक प्रभाव नेटवर्कच्या माध्यमातून विविध समुदायांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम विकसित करतो आहोत आणि राबवतो.

आमची अधिक मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करून सर्वांना हालचाल समान करण्यासाठी, अशी 4 वैयक्तिक, सामाजिक आणि पर्यावरणात्मक आव्हाने आहेत ज्यांच्यावर आम्हाला उपाय योजायचे आहेत:

आर्थिक सबलीकरण

आमचा अधिकाधिक चांगल्या कामावर विश्वास आहे. अमेरिकेत, आम्ही प्लॅटफॉर्मवरील कामाबाबत नवीन दृष्टीकोनाचा पुरस्कार केला आहे, ज्यामध्ये लवचिकतेसाठी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना आवश्यक असलेल्या सुरक्षिततेचा बळी देण्याची गरज पडणार नाही. याचा जगभर परिणाम झाला, ज्यात युरोपमधील आमच्या अधिक चांगली डील याचाही समावेश आहे. Uber ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. आणि आम्ही त्यांचा एव्हरीडे जायंट्स म्हणून सन्मान करतो.

सुरक्षितता

जेव्हा कोविड-19 उद्भवला, तेव्हा आम्हीसुद्धा ठामपणे उभे राहिलो. जे सर्वात महत्त्वाचे आहे ते एका जागेहून दुसरीकडे नेऊन आम्ही आमचे लक्ष सुरक्षिततेवर केंद्रित आहे हे दाखवून दिले. आम्ही अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि असुरक्षित समुदायांना 1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज पुरवल्या. त्यामध्ये घरगुती हिंसा आणि लैंगिक अत्याचार यांची जोखीम असलेल्यांना दिलेल्या 50,000 विनामूल्य राईड्सचा समावेश आहे. आणि त्यानंतर आम्ही लस घेण्यासाठी आणखी 1 कोटी विनामूल्य किंवा सवलतीच्या राईड्स ऑफर केल्या.

शाश्वतता

आम्ही शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. 2040 पर्यंत, जगातील 100% ट्रिप्स शून्य-उत्सर्जन वाहनांमधून किंवा मायक्रोमोबिलिटी आणि सार्वजनिक वाहकीच्या माध्यमातून होत असतील यासाठी आम्ही वचनबद्ध झालो आहोत. Uber Eats वर भांडी मिळण्याची सुविधा ऐच्छिक करून आम्ही एकदा-वापराचे प्लॅस्टिक कमी करण्यासाठीदेखील वचनबद्ध झालो आहोत. आम्ही केनियामध्ये इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादने, फ्रान्समध्ये शाश्वत रेस्टॉरंट मोहिमा आणि टेक्सासमधील एका पवनचक्की फार्मशी नूतनीकरणक्षम-ऊर्जा खरेदी करार असे अनेक उपक्रम राबवत आहोत.

समानता

Uber एक वर्णद्वेष-विरोधी कंपनी आहे. आम्ही 14 वचनबद्धता (आणि या दरम्यान आणखीही) स्वीकारल्या ज्यांमध्ये—आमच्या प्लॅटफॉर्मवरून वर्णद्वेष नाहीसा करण्यापासून ते समुदायामध्ये समानतेला चालना देण्यापर्यंत विविध प्रकारच्या कृतींचा समावेश आहे. समानतेसाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही जगभरातील कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी $1 कोटीचा निधी समर्पित केला. आम्ही आशियाई समुदायाच्या समर्थनातदेखील उभे आहोत आणि भेदभाव-विरोधी प्रशिक्षण देणारे उपक्रम विकसित करत आहोत. याशिवाय आणखी बरेच काही.

आम्ही काय करत आहोत, आम्ही काय साध्य केले आहे आणि आम्ही कशासाठी वचनबद्ध आहोत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही येथे काही कथा देत आहोत.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या कृती

We focus on taking actions to have a positive 
impact in the world.

1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज

जेव्हा महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी जग थांबले तेव्हा आम्ही 1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज दिल्या.

महिलांची सुरक्षितता

महामारीच्या दरम्यान हिंसा आणि हल्ल्याची जोखीम असलेल्यांना 50,000 विनामूल्य राईड्स आणि मील्स पुरवली.