Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

काम करण्याचा एक अधिक चांगला मार्ग

जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी सहाय्य करत आहोत.

कोविड -19 महासाथीच्या प्रभावाने जेव्हा आपला ताबा घेतला तेव्हा ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींनीच अक्षरशः जगाला चालते फिरते ठेवले. आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना घरीच राहण्याचा आणि सामाजिक संपर्क कमी करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याने, आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मिळवण्यात किंवा अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी जाण्यास मदत करण्यात त्यांची भूमिका निर्णायक होती.

ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती शहरांच्या आणि समुदायांच्या वीणेला किती आवश्यक आहेत हे या महासाथीच्या काळा इतके कधीच स्पष्ट झाले नव्हते. ते केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत रायडर्स, अन्न आणि पॅकेजेसच पोचवत नाहीत - लोकांच्या जीवनावरही त्यांचा परिणाम होत आहे. एखाद्या दिवस वाईट गेलेल्या एखाद्या रायडरचे बोलणे ऐकण्यासाठी त्यांनी कदाचित वेळ दिला असेल किंवा एखाद्या वयोवृद्ध रहिवाशासाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करताना आवश्यक असलेल्या गप्पा मारायला ते बागेच्या गेट जवळ थांबले असतील.

म्हणूनच आमचे सीईओ म्हणतात की हे गिग कामगार अधिक चांगले मिळण्यास पात्र आहेत. म्हणूनच आम्ही युरोपमधील लोकांसाठी अधिक चांगली डील जाहीर केली आहे. म्हणूनच एएसयू आणि मुक्त विद्यापीठ यांचे आहेत तसे विनामूल्य पदवी कार्यक्रम प्रदान करण्यासाठी आम्ही विद्यापीठांसह भागीदारी करतो. आणि म्हणूनच आम्ही जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी लोकांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यास शक्य तितके सहाय्य प्रदान करतो.

इलेक्ट्रिक वाहन पद्धतीच्या दिशेने संक्रमण प्रक्रियेला चालना देत आहोत

आमचे Uber Green उत्पादन आणि आमची2040 शून्य-उत्सर्जन प्रतिज्ञा याखेरीज आम्ही अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि उपेक्षित समुदायातील ड्रायव्हर्सना इलेक्ट्रिक वाहनांचा ॲक्सेस मिळू शकेल हे सुनिश्चित करण्यासाठीEVNoire आणि GRID Alternatives यांच्यासह पायलट कार्यक्रम विकसित करण्याचे काम करत आहोत.

ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना आर्थिक साक्षरता कार्यक्रम देत आहोत

ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना यशस्वी होण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही त्यांची वित्तीय स्थिती सुधारण्यास आणि त्यांना भविष्यातील कामासाठी तयार करण्यास मदत करण्यासाठी कार्यक्रम विकसित करतो. आम्ही मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सर्वत्र आयएफसी च्या भागीदारीत अवांझालाँच केले आहे. केनियामध्ये आम्ही एएमआय सह नॅव्हिगेट कार्यक्रम विकसित केला आहे. आणि आम्ही ऑपरेशन होप सह यूएसमध्ये तशाच एका उपक्रमावर काम करत आहोत.

गाडी चालवण्याची आणि इतरही व्यवसायाची कौशल्ये आणि संधी प्रदान करणे

स्वतः उद्योजक असलेले अनेक ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी लोक आमच्या प्लॅटफॉर्मवर सामील होत असतात. यूकेमध्ये, आम्ही व्यवसाय बिल्डर कार्यक्रम चालवण्यासाठी एंटरप्राइझ नेशन सह काम करतो, ज्यातून प्रशिक्षण आणि नवीन व्यवसाय कल्पनांसाठी £10,000 पर्यंत अनुदान निधी प्रदान करतो. दक्षिण आफ्रिकेत आम्ही उपेक्षित पार्श्वभूमीतील तरुणांना Uber Eats प्लॅटफॉर्मवर सामील होता यावे याकरता मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठील्युलाराईड्स ला सहाय्य करतो.

सर्वांसाठी हालचाल समान करण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचा भाग म्हणून, आम्ही जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींसाठी सकारात्मक संधी निर्माण करण्यास वचनबद्ध आहोत.

आमच्या प्लॅटफॉर्म वरील कामाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे नवीन मॉडेल पहा.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

कृष्णवर्णीयांचे व्यवसाय महत्त्वाचे आहेत

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.

सर्व ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींचे‍ आभार

महामारी दरम्यान हजारो ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती जे काही महत्त्वाचे आहे त्याची वाहतूक करत राहिले.