Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज

जेव्हा महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी जग थांबले तेव्हा आम्ही 1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज दिल्या.

कोविड-19 ने आपल्या सर्वांच्या जीवनात आणि आपल्या व्यवसायात उलतापालथ केली. मार्च 2020 मध्ये, Uber—या प्रवासाला सामर्थ्य देणाऱ्या कंपनीने—आमच्या प्लॅटफॉर्मवरील रायडर्सना प्रवास करणे थांबवण्यास सांगितले. आम्ही त्यांना घरीच राहण्यास उद्युक्त केले, जेणेकरून आम्ही जे महत्त्वाचे आहे त्याची वाहतूक करण्यासाठी मदत करू शकू: प्रथम प्रतिसादकर्त्यांना कामाला जाण्यासाठी मदत करणे, वृद्धांना जेवण आणि आघाडीवरील लोकांना आपत्कालीन पुरवठा, या सर्व गोष्टी जगभरातील गरजूंसाठी एक कोटी विनामूल्य राईड्स, जेवण आणि डिलिव्हरीज दान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून.

तीन महिन्यांनंतर, त्या एक कोटी राईड्स आणि डिलिव्हरीज पूर्ण झाल्या होत्या. परिणामी, भारतात डॉक्टर्स कामावर जाऊ शकले. मेक्सिकोमध्ये असुरक्षित कुटुंबांना खाद्यपदार्थाचे पार्सल मिळाले. आणि घरगुती हिंसाचारग्रस्तांना आश्रयस्थानापर्यंत आणि सुरक्षित ठिकाणांपर्यंत प्रवास करता आला. मदतीची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी जगभरात Uber ने 54 देशांमधील 200 हून अधिक संस्थांशी भागीदारी केली. आमच्या जगभरच्या प्रभाव नेटवर्कला चालना देणाऱ्या आमच्या नाविन्यपूर्णतेची फक्त 3 उदाहरणे येथे आहेत:

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (दक्षिण आफ्रिका)

Uber ने संकटाच्या वेळी घरी आश्रय घेतलेल्या रुग्णांना 14 लाखांपेक्षा जास्त प्रिस्क्रिप्शन्स वितरित केली. हा उपक्रम बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहाय्याने वेस्टर्न केप डिपार्टमेंट ऑफ हेल्थच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला.

एनएचएस (युके)

यूके लॉकडाउनमध्ये असताना आम्ही महासाथीच्या पहिल्या लाटेच्या वेळी एनएचएस कर्मचार्‍यांना 300,000 विनामूल्य राईड्स आणि मील्स पुरवली.

वर्ल्ड सेंट्रल किचन (युएस)

आम्ही ब्रॉन्क्स, न्यूयॉर्क; नेवार्क, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन, डीसी येथे महासाथीमुळे घरात अडकलेल्या असुरक्षित समुदायांसाठी 300,000 पेक्षा जास्त ताज्या जेवणांच्या डिलिव्हरीची सोय केली.

या अभूतपूर्व संकटाच्या वेळी आपल्या समुदायांना चालू ठेवण्यास मदत करणारे Uber प्लॅटफॉर्मवरचे कोट्यवधी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती, जे स्वतः अत्यावश्यक कामगार आहेत, यांच्याशिवाय या सर्व राईड्स आणि डिलिव्हरीज शक्य झाल्या नसत्या. आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करणे, हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. त्यांच्या समोरील जोखीम जाणून, आम्ही पीपीईमध्ये $5 कोटीहून अधिक गुंतवणूक केली आणि आम्ही लवकरच आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन जबाबदारीला चालना देण्यासाठी मास्क नाही, राईड नाही धोरणसुरू केले. कोविड-19 चे निदान झालेल्या ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींसाठी थेट आर्थिक सहाय्य करणारे आमच्या उद्योगातले आम्ही पहिले होतो आणि आम्ही ड्रायव्हर्सना शासकीय उत्तेजन पॅकेजेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी यशस्वीरित्या प्रचार केला.

महासाथीमुळे खाद्यपदार्थ डिलिव्हरी स्वीकारण्याला नाट्यमयरित्या वेग आला, तरीही रेस्टॉरंट्ससाठी अजूनही तो एक अविश्वसनीय आव्हानात्मक काळ होता. अर्थातच, या संकटाचा आर्थिक फटका काही फक्त ड्रायव्हर्सनाच बसला नाही. रेस्टॉरंट उद्योगातील कोट्यावधी लोकांना मोठा फटका बसल्याने आम्ही, अमेरिकेतील रेस्टॉरंट एम्प्लॉयी रिलीफ फंड ला 6 दशलक्ष डॉलर्स दान केले, अ‍ॅ‍प-मधून योगदान वैशिष्ट्य लाँच करून रेस्टॉरंट्सच्या बँक खात्यात 2 कोटी डॉलर्सहून अधिक जमा केले आणि अमेरिकेतील अडचणीतील व्यवसायांसाठी 45 लक्ष डॉलर्सचे अनुदान जाहीर केले. आम्ही जगभरातील रेस्टॉरंट्सच्या बदलत्या गरजा भागवण्यासाठी डिझाइन केलेली नवीन अ‍ॅप वैशिष्ट्येदेखील जोडली.

लसीकरणासाठी आमच्या एक कोटी विनामूल्य आणि सवलतीच्या राईड्सबद्दल जाणून घ्या

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

लसीकरणासाठी राईड्स

शिक्षकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही, कोविड-19 लस घेण्यासाठी वाहतूक ही गोष्ट अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आम्ही मदत करत आहोत.

वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता

आपल्या जगामध्ये वर्णद्वेष आणि भेदभावाला स्थान नाही — त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत.