Uber सहाय्यक समुदाय
आपल्याला परिचित असलेले जग आता बदलले आहे. परंतु या अभूतपूर्व काळात समुदाय एकत्र येत असताना, एक गोष्ट निश्चित आहेः उपलब्ध साधनसंपत्ती, अनुकंपा आणि नवकल्पनांद्वारे आपण या संकटावर मात करू.' या काळात Uber पुढे जाण्यासाठी समुदायांसोबत कसे काम करत आहे ते पहा.
10 दशलक्ष राइड्स आणि डिलिव्हरीज
आम्ही जगभरातील आघाडीवर काम करणारे आरोग्यसेवा कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लोकांसाठी 1 कोटी मोफत राइड्स, भोजन आणि डिलिव्हरीज देण्याचे वचन देत आहोत.
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांना मदत करणे
या काळात ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांना सहाय्य करण्यासाठी, अगदी नवीन सुरक्षा टिप्स, त्यांना आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्यात मदत करण्यासाठी संसाधने असलेले आणि वर्क हबद्वारे जास्तीच्या कमाईच्या संधी अॅक्सेस करता याव्यात यासाठी आम्ही अॅपमधेच एक कोविड-19 हब तयार केले आहे.
रेस्टॉरंट्सना सहाय्य करणे
या संकटाचा लक्षावधी रेस्टॉरंट कर्मचारी आणि डिलिव्हरी करणार्या लोकांवर परिणाम झाला आहे. आमच्या स्थानिक रेस्टॉरंट्सना सहाय्य करणे यापूर्वी कधी नव्हते इतके महत्त्वाचे झाले आहे.
“या लढाईत आरोग्यसेवा कर्मचारी अग्रभागी राहून आपल्यासाठी लढा देत आहेत आणि आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. Uber सोबतच्या या निःस्वार्थी भागीदारीमुळे या संकटकाळात आमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या न्यूयॉर्कच्या रहिवाशांना सहाय्य करण्यात आम्हाला मदत मिळेल.”
—मेयर बिल डी ब्लासिओ, न्यूयॉर्क
जगभरातील आमच्या समुदायांना मदत करणे
जगभरातील देश कोविड-19 संकटाला सामोरे जात असताना, आम्ही आमच्या सामाजिक जबाबदारीच्या वचनबद्धता पार पाडण्यासाठी आमची छोटीशी भूमिका बजावत आहोत. आमच्या समुदायांना आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या वीरांना सहाय्य करण्यासाठी आम्ही' शहरे आणि ना-नफा संस्थांसोबत कसे काम करत आहोत ते पहा.
महत्त्वाच्या गोष्टींची ने-आण करण्यासाठी फीडिंग अमेरिका आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्यासोबत भागीदारी केली.
न्यूयॉर्कमधील या अरिष्टातून वाचलेल्या पण घरात अडकलेल्या लोकांना पासओव्हर भोजन डिलिव्हर केले.
शिकागोमध्ये घरगुती हिंसाचार पीडितांना मोफत Uber राइड्स दिल्या.
ब्राझीलमधील झोपडपट्ट्यांमध्ये खाद्यपदार्थाच्या बास्केट्स आणि स्वच्छता किट्सची देणगी दिली.
चिलीमधील लोकांच्या घरात आवश्यक आयटम्स डिलिव्हर करण्यासाठी Uber Flash लाँच केले.
मेक्सिको आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांमध्ये रक्तपेढ्यांपर्यंत मोफत राइड्स ऑफर केल्या.
आफ्रिकन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटसोबत केनिया आणि दक्षिण आफ्रिकेत महिला ड्रायव्हर्सना उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यात मदत केली.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत दक्षिण आफ्रिकेमध्ये कोविड-19 होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या लोकांना 35,000 औषधे डिलिव्हर केली.
दक्षिण आफ्रिकेत एसए हार्वेस्टपासून ते शेल्टर्सपर्यंत 100,000 मोफत भोजन डिलिव्हर केले.
इजिप्तच्या हेल्थ अँड पॉप्युलेशन मंत्रालयासोबत कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील आरोग्यसेवा कर्मचार्यांना 20,000 मोफत ट्रिप्स आणि भोजन देण्यात आले.
Uber Medic द्वारे संपूर्ण पाकिस्तानात 9 रुग्णालयातील आरोग्यसेवा कर्मचार्यांना 13,000 ट्रिप्सची देणगी दिली.
पाकिस्तानमध्ये Uber Delivery लाँच केले, जेणे करून लोक घरात राहतील व त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू त्यांच्या दारापाशी डिलिव्हर होतील.
फ्रान्समधील वृद्धांना मदत करणार्या आरोग्यसेवा कर्मचार्यांना 100,000 ट्रिप्स आणि भोजनांची देणगी दिली.
स्पेनमधील कमी सोयीसुविधा असलेल्या कुटुंबांना आवश्यक वस्तू डिलिव्हर करण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन आणि गॅल्प यांच्यासोबत भागीदारी केली.
युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस कर्मचार्यांना 300,000 मोफत राइड्स आणि भोजन देण्यात आले.
ऑस्ट्रेलियामध्ये Uber Connect ची चाचणी घेतली, ज्यामुळे वापरकर्त्यांना कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना अत्यंत आवश्यक केअर पॅकेजेस पाठवता येतील.
निप्पॉन फाउंडेशनच्या भागीदारीने जपानमध्ये आजारी मुलांना 5,000 भोजनांची देणगी दिली.
आरोग्यसेवा कर्मचार्यांना मोफत राइड्स देण्यासाठी भारतातील राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांसोबत भागीदारी केली.
"We'लोकांना मदतीची सर्वाधिक गरज असताना, समुदायांना जेवू घालण्यात मदत करण्यासाठी आम्हाला Uber सोबतची भागीदारी विस्तारित करताना अतिशय आनंद होत आहे. या आव्हानात्मक काळात, आमच्या खाण्याच्या बॅंकांचे मोठे नेटवर्क आणि Uber ची टीम यांच्या विद्यमान प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यासाठी आणि आमच्या आसपासच्या गरजू व्यक्तींना मदत करण्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी'आम्ही लक्षपूर्वक काम केले आहे."
—निक्की ड्रेविच, इंटरिम चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, फीडिंग अमेरिका
आरोग्य आणि सुरक्षा यास प्रोत्साहन देणे
आमच्या समुदायांमधील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे संरक्षण करण्यास आम्ही सर्वाधिक प्राथमिकता देतो—कोविड-19 संकट ते त्यातून बरे होईपर्यंत.
सार्वजनिक सुरक्षेला सहाय्य करणे
आम्ही'आरोग्य आणि सुरक्षा विषयीच्या टिप्स विकसित केल्या आहेत आणि जगभरातील आमच्या चॅनेल्सवर प्रत्येक रायडर, ग्राहक आणि कमाई करणार्या व्यक्तीसोबत त्या शेअर करत आहोत. Uber वापरणार्या प्रत्येक व्यक्तीस आम्ही सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याची आठवण करून देत आहोत. आणि आम्ही' आमच्या रायडर्सना घरात राहण्यास सांगत आहोत, म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींची ने-आण करण्यात आम्ही मदत करू शकू.
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांना सुरक्षित ठेवणे
ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला आम्ही नेहमीच प्राथमिकता देतो. या अनिश्चित काळामध्ये आम्ही ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांना स्वत:ची काळजी घेण्यात मदत करण्यासाठी सुरक्षा संसाधने एकत्रित केली आहेत आणि त्याचे कार्यक्रम तयार केले आहेत, जसे की मास्क्स, सॅनिटायझर्स आणि वाइप्स देणे.
परिस्थितीची माहिती ठेवा
आम्ही जगभरातील शहरे आणि समुदायांशी कशी भागीदारी करत आहोत याबद्दल नियमितपणे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या बातमीपत्रांकरिता साइन अप करा.
आम्ही कशी मदत करू शकतो?
या काळात तुम्ही कोविड-19 मदत देणार्या एखाद्या संस्थेचा भाग असल्यास, Uber कशी मदत करू शकते ते आम्हाला सांगा.