आमचा पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टीकोन
आम्ही फक्त स्वतःसाठीच नाही तर जे लोक संधीसाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठीसुद्धा अधिक शाश्वत, न्याय्य आणि फायदेशीर भविष्याची कल्पना करतो. एक जागतिक कंपनी म्हणून आम्ही सतत अंतर्गत आणि बाह्य, दोन्ही प्रकारच्या जोखमी आणि संधींचे मूल्यांकन करत असतो. आमच्या व्यवसायावर विविध पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय घटकांचा परिणाम होऊ शकतो हे आम्ही जाणतो आणि आमच्या व्यवसायाचा समाज आणि आमच्या भागधारकांवर काय परिणाम होऊ शकतो ते आम्हाला समजते. आमची भौतिक ईएसजी प्राधान्ये आणि आमच्या व्यवसायाचे तसेच भागधारकांचे हितसंबंध यांचा मेळ साधण्यासाठी काम करून, आमच्या दृष्टिकोनात योग्य ते प्रशासकीय पैलू, सक्रिय सहभाग आणि विचारशीलता समाविष्ट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे आम्हाला आर्थिक मूल्य आणि सतत होणारी दीर्घकालीन वाढ यांचे संरक्षण करता येईल आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवता येतील असा आम्हाला विश्वास आहे.
ईएसजी रिपोर्टिंग
आपण आज कुठे उभे आहोत याचे गंभीर परीक्षण करणे आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी परिणाम शेअर करणे हे प्रगतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. कृपया खाली आमचे ताजे रिपोर्ट्स पहा.
- पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन
- पीपल अँड कल्चर
Down Small - शाश्वतता
Down Small - सुरक्षितता
Down Small - सरकारी पारदर्शकता
Down Small - पॉलिटिकल एंगे जमेंट
Down Small
ड्रायव्हर आणि कुरियर यांचे कल्याण
ड्रायव्हर्स आणि कुरियर्स प्लॅटफॉर्मवर काम करणे मोठ्या प्रमाणात निवडतात कारण वेगवेगळ्या मार्केट्समध्ये केलेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये दिसून आले आहे की त्यांना कधी, कुठे आणि कसे काम करायचे आहे याबद्दलची लवचीकता त्यांना महत्त्वाची वाटते.
आम्ही स्वतंत्र प्लॅटफॉर्म कर्मचार्यांना कमाईच्या लवचीक, निष्पक्ष आणि पारदर्शक संधी, सामाजिक संरक्षण आणि लाभांचा अॅक्सेस, अर्थपूर्ण प्रतिनिधित्व आणि शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारी दर्जेदार अशी प्लॅटफॉर्मवरील कामे मिळावीत यासाठी वकिली करणे सुरू ठेवणार आहोत.
पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदल
Uber अधिक शाश्वत भविष्यासाठी काम करत आहे कारण आमच्या व्यवसायासाठी, आमचा प्लॅटफॉर्म वापरणार्या लोकांसाठी, आम्ही ऑपरेट करत असलेल्या शहरांसाठी आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांसाठी ही योग्य गोष्ट आहे.
आमच्या प्रगतीचा वेग बऱ्याच बाह्य घटकांद्वारे प्रभावित होत असतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोरणकर्ते आणि विस्तृत ऑटो उद्योगाच्या कृतींनी. जेव्हा आम्ही आमची 2025 हवामानाची उद्दीष्टे निर्धारित केली, तेव्हा आम्ही अशी अपेक्षा केली होती की उद्योगव्यापी शाश्वत गुंतवणूकीबरोबरच मजबूत नियामक उपायांमुळे आमच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल. प्रगती निश्चितच झाली आहे, परंतु दुर्दैवाने, अधिक आक्रमक कृती केल्याशिवाय आम्ही 2025 ची आमची सर्व उद्दिष्टे साध्य करू शकणार नाही. ही आव्हाने असूनही, आम्ही 2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन करणारा प्लॅटफॉर्म बनण्याच्या आमच्या ध्येयासाठी अथक परिश्रम घेत आहोत.
सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांनी अधिक तातडीची कृती करण्याची गरज आहे आणि आम्ही धोरणकर्ते आणि वाहन निर्मात्यांकडून अधिक मजबूत कारवाई व्हावी यासाठी वकिली करत राहू.
आमचा वार्षिक पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय अहवाल आणि आमचा नियतकालिकहवामान मूल्यांकन आणि कामगिरी अहवाल याद्वारे आम्ही आमच्या प्रगतीबद्दल पारदर्शकता राखणे सुरू ठेवू.
पीपल अँड कल्चर
विविध प्रकारच्या लोकांना आकर्षित करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे आमच्यासाठी आवश्यक आहे—विशेषतः अशा लोकांना जे आमच्या ध्येयाने प्रेरित असतील आणि त्याबद्दल उत्साही असतील. आम्हाला अशा दृढनिश्चयी लोकांची गरज आहे ज्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या जगभरातील प्रत्येकाचे काम अधिक चांगल्या प्रकारे कसे होऊ शकेल यासाठी काही करण्याची इच्छा आहे. आम्ही प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे, म्हणूनच आम्ही कोण आहोत आणि Uber मध्ये काम करणे कसे असते याबाद्दल स्पष्टता राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
कर्मचाऱ्यांंसाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे आणि ते येथे का टिकून राहतात आणि त्यांचे करिअर येथे का घडवतात हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून डेटा गोळा करत आहोत. आमची प्राधान्ये आणि दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी आम्ही या सखोल माहितीचा वापर करत आहोत. त्याचा परिणाम असा की आम्ही कर्मचाऱ्यांच्या 6 वेगवेगळ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे: अभिमान, आपलेपणा आणि समानता, विकास, मोबदला, कल्याण आणि विश्वास. हे मनुष्यबळ धोरण याची खात्री करते आहे की आम्ही आमच्या वैविध्यपूर्ण कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये एक सहभागपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक अनुभव निर्माण करणे सुरू ठेवू.
नागरी हक्क मूल्यांकन
लोकांना मुक्तपणे, समानतेने आणि सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे. त्या उद्दिष्टाच्या समर्थनार्थ आणि भागधारकांच्या सक्रिय सहभागानंतर, Uber ने नागरी हक्क मूल्यांकन केले आहे. अमेरिकेचे माजी ॲटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्या मार्गदर्शनाखाली कोव् हिंग्टन आणि बर्लिंग यांनी हे मूल्यांकन केले. नागरी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आम्हाला एक न्याय्य आणि सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म म्हणून सुधारणा करणे सुरू ठेवता यावे अशी क्षेत्रे ओळखण्याच्या उद्देशाने हे मूल्यांकन यूएस मधील राईडशेअर ड्रायव्हर्स, समुदाय आणि कर्मचार्यांवरील आमच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केले गेले होते.
प्रशासन
आमचे संचालक मंडळ सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतिक, शासकीय आणि कॉर्पोरेट जबाबदारीच्या संदर्भात आमच्या भागधारकांशी पारदर्शक आणि त्यांच्याप्रति उत्तरदायी असले पाहिजे यावर मंडळाचा ठाम विश्वास आहे. जागतिक दर्जाची सार्वजनिक कंपनी प्रशासकीय संरचना तयार करण्याच्या आमच्या प्रवासात, आम्ही विविध पार्श्वभूमी, कौशल्ये आणि अनुभव असलेल्या लोकांसह एक सशक्त संचालक मंडळ नेमले आहे.
आमच्या भौतिकता मूल्यमापनात ओळखल्या गेलेल्या ईएसजी समस्या आमच्या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशासाठी आणि आमच्या व्यावसायिक धोरणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. वस्तुतः, आणि योग्य त्याप्रमाणे, या समस्यांवर Uber चे संचालक मंडळ आणि बोर्डाच्या स्वतंत्र लेखापरीक्षण, नुकसान भरपाई आणि नामनिर्देशन आणि प्रशासकीय समित्या लक्ष ठेवून असतात.
Uber च्या ईएसजी रिपोर्टिंगमध्ये आमच्या भविष्यातील, व्यावसायिक अपेक्षांबाबत पुढील वाटचालीचा वेध घेणारी विधाने असू शकतात, आणि त्यांत जोखमी आणि अनिश्चिततांचा समावेश आहे. वास्तविक परिणाम अंदाजित परिणामांपेक्षा फार वेगळे असू शकतात, आणि नोंदवलेले परिणाम हे भविष्यातील कामगिरीचे संकेत म्हणून मानले जाऊ नयेत. अधिक माहितीसाठी कृपया आमचा 2024 ईएसजी रिपोर्ट पहा.
Uber च्या ईएसजी रिपोर्टमधील हरितगृह वायू उत्सर्जनाच्या डेटाची पडताळणी एलआरक्यूएने केली आहे. एलआरक्यूए च्या पडताळणीचे स्टेटमेंट येथे पाहू शकता.
Uber च्या कार्बन ऑफसेट्सच्या वापराचा आढावा येथे पाहू शकता.
याच्या विषयी