आमच्याबद्दल
जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आम्ही नव्या कल्पना राबवतो
आम्ही चलनवलनाला शक्ती देतो. ते आमचा रक्तप्रवाह. ते आमच्या धमन्यांमधून वाहते. यामुळेच आम्हाला दररोज नवीन दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते. चलनवलन अधिक चांगले कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी ते आम्हाला प्रवृत्त करते. तुमच्यासाठी. तुम्हाला जिथे जायचे आहे अशा सर्व ठिकाणांसाठी. तुम्ही मिळवू इच्छिता अशा सर्व गोष्टींसाठी. तुम्हाला ज्यांच्याद्वारे कमाई करायची आहे अशा सर्व मार्गांसाठी. संपूर्ण जगभरात सर्वत्र. प्रत्यक्ष त्या वेळेत. आताच्या अविश्वसनीय वेगाने.
- आमचे संपूर्ण मिशन स्टेटमेंट वाचा
आम्ही Uber आहोत. लक्ष्यप्राप्तीसाठी झटणारे आहोत. लोकांना कुठेही जाण्यात आणि काहीही मिळवण्यात आणि त्यांच्या मार्गावर कमाई करण्यात मदत करण्याचा आमचा ध्यास पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करणारे लोक आहोत. चलनवलन ही आमची शक्ती आहे. तो आम्हाला जीवन देणारा घटक आहे. हे आमच्या नसानसात भिनलेले आहे. यामुळेच आम्हाला दररोज नवीन दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते. चलनवलन अधिक चांगले कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी ते आम्हाला प्रवृत्त करते. तुमच्यासाठी. तुम्हाला जिथे जायचे आहे अशा सर्व ठिकाणांसाठी. तुम्ही मिळवू इच्छिता अशा सर्व गोष्टींसाठी. तुम्हाला ज्यांच्याद्वारे कमाई करायची आहे अशा सर्व मार्गांसाठी. संपूर्ण जगभरात सर्वत्र. प्रत्यक्ष त्या वेळेत. आताच्या अविश्वसनीय वेगाने.
आम्ही एक अशी तंत्रज्ञान कंपनी आहोत जी चलनवलन शक्य व्हावे यासाठी भौतिक आणि डिजिटल विश्वांना एकमेकांशी जोडते. कारण आम्ही अशा जगावर विश्वास ठेवतो जिथे चलनवलन उपलब्ध असले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला सुरक्षितपणे चलनवलन आणि कमाई करता येईल. तेदेखील आपल्या पृथ्वीच्या नैसर्गिक संतुलनासाठी योग्य अशा पद्धतीने. आणि तुमचे लिंग, वंश, धर्म, क्षमता किंवा लैंगिक अभिमुखता विचारात न घेता, तुम्हाला मुक्तपणे आणि निर्भयतेने चलनवलन आणि कमाई करता यावी या तुमच्या अधिकाराचे आम्ही समर्थन करतो. अर्थात, आम्हाला या गोष्टी नेहमीच योग्य पद्धतीने जमल्या आहेत असे नाही. पण आम्ही अपयशाला घाबरत नाही, कारण त्यामुळेच आम्ही अधिक चांगले, शहाणे आणि मजबूत बनतो. आणि त्यामुळे आम्ही आमचे ग्राहक, स्थानिक समुदाय आणि शहरे आणि आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांचा अतुलनीय वैविध्यपूर्ण असलेला संच यांच्यासाठी योग्य गोष्टी करण्यासाठी आणखी जास्त वचनबद्ध होतो.
Uber या कल्पनेचा जन्म 2008 मध्ये पॅरिसमध्ये हिमवर्षाव होत असलेल्या एका रात्री झाला आणि तेव्हापासून आमचा पुनर्कल्पना आणि पुनर्शोधाचा DNA सतत कार्यरत आहे. आम्ही आता आमच्या सतत विस्तारणाऱ्या पद्धतींनी लोकांचे आणि वस्तूंचे चलनवलन आणि बदलत्या कमाईचे मार्ग देणाऱ्या एका जागतिक प्लॅटफॉर्मच्या रूपात विकसित झालो आहोत. आम्ही 4 चाकांवरील राईड्स ते 2 चाकांवरील राईड्स ते 18-चाकांवरील मालवाहतुकीपर्यंत प्रगती केली आहे. टेकआउट मील्स असोत किंवा दैनंदिन आवश्यक गोष्टी अथवा डॉक्टरने लिहून दिलेली औषधे वा तुम्हाला कधीही लागणारी कोणतीही गोष्ट किंवा तुमच्या मर्जीने कमाई करण्याच्या संधी. ज्यांची पार्श्वभूमी तपासणी झालेली आहे अशा ड्रायव्हर्सपासून ते प्रत्यक्ष त्या वेळच्या पडताळणीपर्यंत, प्रत्येक दिवशी सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. Uber मध्ये, पुनर्कल्पना करण्याचा ध्यास कधीही पूर्ण होत नाही, कधीही थांबत नाही आणि ती नेहमीच फक्त सुरुवात असते.
आमच्या सीईओचे पत्र
आमच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला पुढे जाण्यात मदत करणारे तंत्रज्ञान देण्याच्या आमच्या टीमच्या वचनबद्धतेबद्दल वाचा.
शाश्वतता
सार्वजनिक वाहतूक असो किंवा मायक्रोमोबिलिटी, शून्य उत्सर्जन करणार्या वाहनांमध्ये 100% राईड्स हे साध्य करून, Uber 2040 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक, शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्यासाठी वचनबद्ध आहे. जगातील सर्वात मोठा मोबिलिटी प्लॅटफॉर्म या नात्याने हवामान बदलाचे आव्हान अधिक आक्रमकपणे हाताळणे ही आमची जबाबदारी आहे. रायडर्सना पर्यावरणपूरक राईड्सचे अधिक पर्याय ऑफर करून, ड्रायव्हर्सना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास मदत करून, पारदर्शकतेला प्राधान्य देऊन आणि स्वच्छ आणि न्याय्य उर्जा संक्रमण जलद होण्यात मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राशी भागीदारी करून आम्ही हे साध्य करू.
राईड्स आणि त्यापलीकडे
रायडर्सना अ ठिकाणापासून ब ठिकाणी जाण्याचा एक मार्ग देण्यासोबतच, आम्ही लोकांना खाद्यपदार्थ त्वरीत आणि स्वस्तात ऑर्डर करण्यात मदत करत आहोत, आरोग्यसेवेतील अडथळे दूर करत आहोत, मालवाहतुकीच्या बुकिंगचे नवीन उपाय तयार करत आहोत आणि कंपन्यांना कर्मचार्यांच्या प्रवासाचा सुरळीत अनुभव प्रदान करण्यात मदत करत आहोत. आणि नेहमी ड्रायव्हर्स आणि कुरियर्सना कमाई करण्यात मदत करत असतो.
तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते
तुम्ही मागील सीटवर असाल किंवा वाहन चालवत असाल, तुमची सुरक्षा महत्त्वाची असते. आम्ही आमची भूमि का पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि तंत्रज्ञान हा आमच्या दृष्टिकोनाचा मूळ गाभा आहे. सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात आणि प्रत्येकासाठी फिरणे सोपे करण्यात मदतीसाठी आम्ही सुरक्षेच्या पुरस्कर्त्यांसह भागीदारी करतो आणि नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रणा विकसित करतो.
कंपनीविषयक माहिती
Uber कोण चालवत आहे
आम्ही Uber मध्ये एक अशी संस्कृती तयार करत आहोत जी रायडर्स, ड्रायव्हर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य गोष्ट करण्यावर निर्विवादपणे जोर देते. नेतृत्व करणाऱ्या टीमबद्दल अधिक जाणून घ्या.
विविधता योग्यपणे अमलात आणणे
एक सर्वसमावेशक आणि आम्ही सेवा देत असलेल्या शहरांची विविधता प्रतिबिंबित करणारे कार्यस्थळ तयार करणे हा आमचा उद्देश आहे. कामाची अशी जागा जेथे प्रत्येकजण स्वतःच्या अस्सल स्वरुपात वावरू शकेल आणि त्या अस्सलपणालाच ताकद मानले जाईल. प्रत्येक पार्श्वभूमीतील लोक यशस्वी होऊ शकतील असे वातावरण तयार करून आम्ही Uber ला एक अधिक चांगली कंपनी बनवू—आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आमच्या ग्राह कांसाठी.
सचोटीने काम करणे
कंपनीमध्ये सर्वोच्च पातळीची सचोटी राखण्याच्या आमच्या वचनबद्धतेची रूपरेषा Uber च्या नैतिकता आणि अनुपालन कार्यक्रम सनदेत देण्यात आली आहे. नैतिकतेवर आधारित असलेल्या संस्कृतीसाठी पारदर्शकता महत्त्वाची असते. आमची सचोटी हेल्पलाइन आणि अनुपालनाच्या वेगवेगळ्या मापनीय आणि परिणामकारक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ती साध्य करत असतो.
नवीन गोष्टींबद्दल अद्ययावत रहा
ताज्या बातम्या
भागीदारी, ॲप अपडेट्स, उपक्रम आणि तुमच्या जवळपासच्या व जगभरातील बऱ्याच गोष्टींबद्दल घोषणा मिळवा.
ब्लॉग
फिरण्यासाठी नवीन ठि काणे शोधा आणि Uber उत्पादने, भागीदारी आणि बर्याच गोष्टींबद्दल जाणून घ्या.
गुंतवणूकदारांचे संबंध
आर्थिक अहवाल डाउनलोड करा, पुढच्या तिमाहीच्या योजना पहा आणि आमच्या कॉर्पोरेट जबाबदारीच्या उपक्रमांबद्दल वाचा.