Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कर्मचाऱ्यांचे चलनवलन Uber shuttle for business द्वारे करा

दररोजच्या कम्युट्स असोत किंवा एका कॅम्पसमधून दुसरीकडे तातडीने जाणे, 'बिझनेससाठी Uber Shuttle' सेवा भरपूर लेगरूम असलेल्या तणावमुक्त ट्रिप्सद्वारे समूहांची वाहतूक करण्याच्या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात मदत करू शकते.

तुमच्या सामूहिक वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचारी शटल सेवा कस्टमाइझ करा

कर्मचारी कम्युट्स

कर्मचाऱ्यांना शटल पर्याय ऑफर करून दररोजचे कम्युट्स अधिक सुविधाजनक बनवा. सर्वोत्तम टॅलेंट आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विशेष लाभ म्हणूनदेखील तुम्ही ही सेवा प्रस्तुत करू शकता.

एका कँपसमधून दुसऱ्याकडे वाहतूक

Uber च्या सेवांद्वारे मौल्यवान विश्लेषण क्षमतांचा ॲक्सेस मिळवून पार्किंग सुविधांपासून, इमारतींच्या दरम्यान किंवा कँपसच्या अंतर्गत प्रवास सुलभ करा.

शेवटच्या मैलाचे कनेक्शन

कर्मचाऱ्यांना तुमचे कामाचे ठिकाण आणि रेल्वे स्टेशन्स, सबवे स्टॉप्स आणि बस डेपोज यांसारख्या स्थानिक सार्वजनिक परिवहन केंद्रांदरम्यान फक्त एका Uber ॲपद्वारे सहजपणे प्रवास करण्यास मदत करा.

 • तुमची स्वतःची शटल असो किंवा तुम्हाला शटल फ्लीट भागीदाराची गरज असो, आमचा प्लॅटफॉर्म आम्हाला तुमच्या परिस्थितीला योग्य असा दृष्टिकोन तयार करण्यात मदत करतो.

 • रायडर्सना सर्वोत्तम अनुभव Uber ॲपद्वारे मिळणार असला तरी, त्यांना ते वापरणे सक्तीचे नाही. नियोक्त्यांकडे त्यांच्या कर्मचाऱ्यांना शटल्ससाठी स्वयंचलितपणे बुक (ऑटो-बुक) करण्याची क्षमता असते जेणेकरून ड्रायव्हर तरीही त्यांना चेक इन करू शकतात आणि ॲडमिन्स तरीही डेटा पाहू शकतात.

कर्मचारी शटल सेवा वापरण्याचे फायदे

 • वेळ आणि खर्चाची बचत

  कमी खर्चात अधिक लोकांचे चलनवलन करा. आम्‍ही तुम्‍हाला एक असे कार्यक्षम कर्मचारी शटल नेटवर्क तयार करण्‍यात मदत करू शकतो, जे वाहन क्षमता, वेळापत्रक, राउटिंग आणि इतर अनेक बाबतीत ऑप्टिमाइझ केलेले आहे.

 • लवचिक, खास तुमच्यासाठी बनवलेले उपाय

  तुमच्या गरजा पूर्ण करणारा भागीदार निवडा. एक मिनीबस असो किंवा लक्झरी कोचेसचा ताफा, आम्ही तुमच्यासह काम करून तुमच्या योजनेला अनुरूप असा कॉर्पोरेट शटल उपाय तयार करू.

 • सखोल माहिती आणि नियंत्रण

  वापर, वेळेबाबत नियमितता आणि बिलिंग ट्रेंड्स दाखवणारे डॅशबोर्ड्स, यामुळे कर्मचारी तुमची कॉर्पोरेट शटल सेवा कशी वापरतात—आणि तुम्ही ती कशा प्रकारे सुधारू शकता हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते.

 • आरामदायक वाहतूक

  तुमचे अनेक कर्मचारी आधीच वैयक्तिक प्रवासासाठी वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या प्रवासासाठी निश्चित आणि तणावमुक्त मार्ग ऑफर करा.

 • अधिक सुरक्षितता आणि विश्वास

  Uber च्या तंत्रज्ञानाने सक्षम केलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे आणि 24/7 ग्राहक सहाय्यामुळे, तुमच्या कर्मचाऱ्यांची नेहमीच चांगली काळजी घेतली जाते.

 • कमी उत्सर्जन

  तुमची कॉर्पोरेट शाश्वततेची उद्दिष्टे पूर्ण करा. ‍या कर्मचारी शटल सेवेमध्ये‍ भाग घेणारी प्रत्येक व्‍यक्‍ती रस्त्यावरील आणखी एक वाहन कमी करत असते, म्हणजेच तुमच्या कंपनीच्या कार्बन फुटप्रिंटमध्ये घट करत असते.

1/6

तुमच्या कर्मचारी शटल सेवेचा मार्ग

पायरी 1: तुमचा कस्टमाइझ केलेला कार्यक्रम तयार करण्यात आणि त्यात योगदान देण्यात मदत करा

आमची प्रश्नावली पूर्ण करून सुरुवात करा. त्यानंतर, सुरुवातीच्या ओळख सत्रानंतर, आम्ही मार्ग, वेळा आणि वाहनांचे सोयिस्कर पर्याय असलेला वैयक्तिकृत असा उपाय आखू.

पायरी 2: शटल राईड्स कशा ऑफर करायच्या ते ठरवा

कर्मचारी थेट Uber ॲपमध्ये मार्गाचे वेळापत्रक पाहू शकतील आणि सीट्सची विनंती करू शकतील. नियोक्तेदेखील सोयीस्करपणे रायडर्ससाठी स्वयंचलित बुकिंग करू शकतात, जेणेकरून त्यांच्या सीट्स नेहमी आरक्षित राहतील.

पायरी 3: तुमची सेवा ऑप्टिमाइझ करा

सरस अनुभव घ्या. डॅशबोर्ड्समुळे मार्गांची उपयुक्तता, रायडरशिप, ओव्हरहेड खर्च आणि इतर अनेक बाबतीत मौल्यवान आणि सखोल माहिती मिळते. तुम्ही आवश्यकतेनुसार मार्ग जोडू किंवा काढू शकता.

टीमच्या वाहतुकीचे नियंत्रण तुमच्या हाती घ्या

 • मार्गांची संख्या, कर्मचारी रायडर संख्या, वारंवारता आणि इतर अनेक घटकांनुसार किंमत बदलू शकते. आमच्या संपर्क फॉर्मद्वारे आमच्या टीमशी विनामूल्य सल्लामसलतीची वेळ ठरवून, तुम्ही आम्हाला तुमची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करू शकाल. त्यानंतर, तुम्ही फक्त तुमच्या गरजेच्या गोष्टींसाठी पैसे देत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला अनुकूल असा दृष्टिकोन तयार करू.

 • Uber for Business च्या माध्यमातून शटल सेवा तुमच्या कंपनीच्या गरजेनुसार आणि तुमचे कर्मचारी कोठे राहतात यावर आधारित ऑप्टिमाइझ केलेले नेटवर्क डिझाइन करण्यासाठी Uber च्या प्रगत रूटिंग अल्गोरिदमचा लाभ घेतात. कमी वाहनांचा वापर आणि लहान मार्ग आणि अधिक सोयीस्कर पिकअप पॉइंट्स तयार करणे या कारणांमुळे इतर सेवा प्रदात्यांच्या तुलनेत कॉर्पोरेट शटल वापरणे हा संभाव्यपणे अधिक किफायतशीर उपाय असू शकतो.

 • मार्ग आणि शेड्युल्स क्लायंटच्या कंपनीच्या कामकाजाच्या गरजांच्या आधारे त्यांच्या ॲडमिनच्या सहकार्याने निश्चित केले जातात. ते बदलण्याची आवश्यकता असल्यास, क्लायंट नेटवर्कमध्ये बदल करण्याची विनंती करू शकतो, जसे की नवीन पिकअप पॉइंट्स जोडणे आणि शेड्युल्स बदलणे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या शटल मार्गावर दररोज सीट्स बुक करण्याची सोय आहे.

 • Uber तुमच्या कामकाजाच्या गरजा आणि खर्च आणि सुविधेच्या प्राधान्यांनुसार सोयीस्कर उपाय देते. आम्ही तुमचे विद्यमान नेटवर्क आहे तसे ऑपरेट करू शकतो किंवा तुमच्या गरजेनुसार कस्टमाइझ केलेले नेटवर्क डिझाइन करू शकतो. आमच्या उत्पादनामध्ये विविध कॉन्फिगरेशन्स आहेत जी समस्यांचे पॉइंट्स आणि रायडर्स व उद्योगांच्या विविध प्रोफाइल्स हाताळतात.

 • अनपेक्षित परिस्थितीत शटल पिकअपमध्ये व्यत्यय आल्यास, आम्ही रायडर्सना त्यांच्या अंतिम ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी त्वरित UberX प्रोमो कोड्स प्रदान करतो (स्थानिक UberX कव्हरेजच्या अधीन राहून). आमची लाइव्ह मॉनिटरिंग साधने आणि सहाय्य टीम एखाद्या ड्रायव्हरने न स्वीकारणे सक्रियपणे डिटेक्ट करून शटल प्रस्थानांसाठी त्वरित बदली व्यवस्था सुनिश्चित करते.

 • Uber Shuttle च्या सेवा तुमच्यासाठी कस्टमाइझ आणि ऑप्टिमाइझ केलेली सेवा डिझाइन करण्याच्या तुमच्या गरजांनुसार विविध वाहन क्षमता प्रदान करू शकतात. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे, मागणी वेगवेगळी असल्यास वेगवेगळ्या मार्गांवर वेगवेगळ्या क्षमतेच्या वाहनांसह सेवा प्रदान केली जाऊ शकते.

 • आमच्या टीमशी विनामूल्य सल्लामसलतीची वेळ ठरवण्यासाठी आमचा संपर्क फॉर्म विनासंकोच भरा. त्या नंतर, आम्ही तुमच्यासोबत काम करून तुमची परिस्थिती आणि आपण भविष्यात संभाव्यपणे एकत्र कसे काम करू शकतो हे समजून घेऊ शकतो.