तुमचे शहर, आमची बांधिलकी
Uber 2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन आणि कमी-पॅकेजिंग-कचरा प्लॅटफॉर्म बनण्याचा प्रयत्नात आहे.
दिवसाला लाखो ट्रिप्स, शून्य उत्सर्जन आणि टिकाऊ पॅकेजिंग पर्याय निवडणे
पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीशी आमची हीच बांधिलकी आहे आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व काही करू. इलेक्ट्रिक आणि शेअर केलेल्या राईड्स हा योग्य मार्ग असेल. बसेस, ट्रेन्स, सायकली आणि स्कूटर्सना देखील हे लागू असेल. याचा अर्थ असा की अधिक टिकाऊ पर्याय वापरून लोकांना प्रवास करण्यात, जेवण ऑर्डर करण्यात आणि गोष्टी पाठवण्यात मदत केली जाईल. हे बदल सहजासहजी होणार नाहीत आणि ते साध्य करण्यासाठी काम आणि वेळ देण्याची गरज असेल. पण आमच्याकडे तेथे पोहोचण्याची योजना आहे आणि त्याकरिता तुम्ही आमच्यासह एकत्रितपणे काम कराल अशी आमची इच्छा आहे.
2020
शून्य-उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनण्यासाठी जागतिक वचनबद्धतेची घोषणा केली आहे.
2023
शून्य-उत्सर्जन डिलिव्हरी ट्रिप्स समाविष्ट करण्यासाठी आणि अधिक-शाश्वत पॅकेजिंग पर्यायांकडे वळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विस्तारित जागतिक बांधिलकी.
2025
प्र मुख युरोपियन शहरांमध्ये एकूण किलोमीटर्सच्या 50% प्रवास ईव्हीज् मध्ये होत असून आमच्या Green फ्युचर कार्यक्रमाद्वारे हजारो ड्रायव्हर्स इलेक्ट्रिक वाहन (ईव्हीज्) पर्याय स्वीकारत आहेत.
संपूर्ण युरोपियन आणि आशिया पॅसिफिक शहरांमध्ये Uber Eats वरील रेस्टॉरंट्सच्या 80% ऑर्डर्स एकदा वापरून टाकून दिलेल्या प्लास्टिक वरून पुन्हा वापरता येण्याजोग्या, पुनर्वापर करण्यायोग्य किंवा कंपोस्ट करण्यायोग्य पॅकेजिंग पर्यायांमध्ये परिवर्तीत होत आहेत.
2030
Uber यूएस, कॅनडा आणि युरोपियन शहरांमध्ये शून्य-उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्म म्हणून काम करत आहे.
Uber Eats वरील 100% रेस्टॉरंट व्यापारी जागतिक स्तरावर पुन्हा वापरता येण्याजोग्या, पुनर्वापर करण्यायोग्य किंवा कंपोस्ट करण्यायोग्य पॅकेजिंग पर्यायांकडे वळले आहेत.
2040
जगभरातील 100% राईड्स आणि डिलिव्हरीज या शून्य-उत्सर्जन करणारी वाहने किंवा हलकी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे होतात.
प्रदुषणमुक्त राईडसाठी आणखी मार्ग ऑफर करणे
आम्ही वैयक्तिक कारसाठी टिकाऊ, शेअर करता येतील असे पर्याय देण्यास वचनबद्ध आहोत.
Uber Green
Uber Green हा विना-किंवा कमी-उत्सर्जन राईड्ससाठी जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेला मागणीनुसार मोबिलिटी उपाय आहे. 3 खंड, 20 देश आणि शेकडो शहरांमधील 110 प्रमुख शहरी बाजारपेठांमध्ये Uber Green आज, उपलब्ध आहे.
ट्रांझिट
आम्ही थेट Uber अॅपमध्ये रीअल-टाइम परिवहन माहिती आणि तिकिट खरेदी जोडण्यासाठी जगभरातील स्थानिक परिवहन एजन्सीसह भागीदारी करत आहोत.
बाइक्स आणि स्कूटर्स
हलक्या वाहनांचे पर्याय वाढवण्याच्या योजनेसह आम्ही जागतिक स्तरावर 55+ शहरांमध्ये Uber अॅपमध्ये लाइम बाईक्स आणि स्कूटर्सचा समावेश केला आहे.
ड्रायव्हर्सना इलेक्टिक मार्ग अवलंबण्यात मदत करणे
Drivers are leading the way toward a greener future, and Uber is committed to supporting them. Our Green Future program provides access to resources valued at $800 million to help hundreds of thousands of drivers transition to battery EVs.
व्य ापाऱ्यांना अधिक टिकाऊ पॅकेजिंग अॅक्सेस करण्यात मदत करणे
एकदा वापरून टाकून दिलेल्या प्लास्टिकमुळे होणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यावर उपाय करण्यासाठी, आम्ही रेस्टॉरंट व्यापाऱ्यांची पुनर्वापर करण्यायोग्य, कंपोस्टेबल आणि पुन्हा वापरता येण्याजोगा पॅकेजिंग पर्याय निवडण्यात मदत करण्यास वचनबद्ध आहोत. 2030 पर्यंत Uber Eats रेस्टॉरंट डिलिव्हरीजमधून सर्व अनावश्यक प्लास्टिक कचरा काढून टाकणे आणि 2040 पर्यंत डिलिव्हरीजवरील उत्सर्जन कमी करणे या उद्दिष्टांसह आम्ही बचती, इंसेंटीव्ह आणि वकिलीच्या संयोजनाद्वारे व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक शहरातील व्यापाऱ्यांना या बदलामध्ये मदत करू.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भागीदारी करणे
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी Uber आमचे नावीन्य, तंत्रज्ञान आणि प्रतिभा घेऊन येत आहे. स्वच्छ आणि योग्य उर्जा संक्रमण जलद गतीने होण्यास मदत करण्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघ आणि पर्यावरणाचे संरक्षण करणार्या संस्थांशी भागीदारी करत आहोत. आम्ही प्रदुषणमुक्त वाहने आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधा परवडतील अशा पद्धतीने ड्रायव्हर्सना उपलब्ध करून देण्यात मदतीसाठी तज्ञ, वाहन निर्माते, चार्जिंग नेटवर्क प्रदाते, ईव्ही आणि ई-बाईक भाड्याने देणार्या फ्लीट्स तसेच उपयुक्त कंपन्यांसोबत मिळून काम करत आहोत. रेस्टॉरंट व्यापाऱ्यांना कमी दरात दर्जेदार पॅकेजिंग ॲक्सेस करता यावे यासाठी आम्ही पुनर्वापर करण्यायोग्य, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि कंपोस्टेबल पॅकेजिंगच्या पुरवठादारांसह काम करत आहोत.
आमचे सहयोगी आणि भागीदार
चार्ज करण्याच्या सुविधा
इलेक्ट्रिक वाहने
शाश्वत पॅकेजिंग
पारदर्शतेला प्राधान्य देणे
आम्ही आज कुठे आहोत याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणि जबाबदारीने गाडी चालवण्यासाठी परिणाम शेअर करून प्रगतीची सुरुवात होते.
ईएसजी रिपोर्ट
मुख्य व्यवसाय आणि सामाजिक प्रभाव उपक्रमांद्वारे आम्ही प्रत्येकाच्या प्रत्यक्ष जगण्यातील चलनवलन कसे सुलभ करतो, हे Uber च्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) रिपोर्टमध्ये दिसून येते.
हवामान मूल्यां कन आणि कामगिरी अहवाल
आमचा हवामान मूल्यांकन आणि कामगिरी अहवाल यूएस, कॅनडा आणि युरोपमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये आमच्या प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या अब्जावधी राईड्सचे विश्लेषण करतो. ड्रायव्हर्स आणि रायडर्सच्या आमच्या उत्पादनांच्या वास्तविक-जागतिक वापरावर आधारित प्रभाव मेट्रिक्सचे मूल्यांकन करणारी आणि ते प्रकाशित करणारी Uber ही पहिली—आणि एकमेव—मोबिलिटी कंपनी होती.
युरोपमध्ये स्पार्किंग विद्युतीकरण
Uber युरोप आणि जगभरातील शाश्वततेसाठी असलेल्या आपल्या वचनबद्धतेला गती देत आहे. आमचा स्पार्क! अहवाल Uberचा दृष्टीकोन आणि आमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही कार निर्माते, चार्जिंग कंपन्या आणि धोरणकर्ते यांच्याशी भागीदारी कशी करू इच्छितो याची तपशीलवार माहिती देतो.
विज्ञान आधारित लक्ष्यांचा पुढाकार
शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्याच्या आमच्या धोरणामध्ये जबाबदारी आणि कठोरता पाळण्यात मदत करण्यासाठी Uber ने सायन्स बेस्ड ट्रागेट्स इनिशिएटिव्ह (एसबीटीआय) मध्ये सामील झाले आहे. एसबीटीआय लक्ष्य सेट करण्यामध्ये आणि प्रगतीचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्याच्या व मंजुरी देण्याच्या सर्वोत्तम पद्धती परिभाषित करते.
ही साइट आणि संबंधित हवामान मूल्यांकन आणि कामगिरी रिपोर्ट; स्पार्क! रिपोर्ट; आणि पर्यावरण, सामाजिक आणि शासन रिपोर्टमध्ये आमच्या भविष्यातील व्यवसायातील अपेक्षा आणि उद्दिष्टे, ज्यात जोखीम आणि अनिश्चितता समाविष्ट आहेत, त्यासंबंधित पुढे नेणा री स्टेटमेंट्स आहेत . वास्तविक परिणाम अपेक्षित परिणामांपेक्षा फार वेगळे असू शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया रिपोर्ट्स पहा.
याच्या विषयी