Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

2022 चा पीपल अँड कल्चर रिपोर्ट

आमच्या लोकांमध्ये आणि संस्कृतीमध्ये गुंतवणूक करणे

2017 मध्ये, आम्ही काय बनू इच्छितो हे पाहण्यासाठी आम्ही किंचित थांबून स्वतःमध्ये डोकावून पाहिले. आज Uber जे काही आहे ते साकारण्याच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा क्षण होता. कोव्हिंग्टन रिपोर्टने कोणताही आडपडदा न ठेवता व्यवसायाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या पैलूवर प्रकाश टाकून आम्हाला कुठे सुधारणेला वाव आहे ते लक्षात आणून दिले. यात निःसंदिग्ध अशा कटू सत्यांकडे लक्ष वेधले गेले आणि Uber ला नेतृत्व निरीक्षणाची पुनर्रचना करण्यासाठी, कर्मचारी धोरणे आणि कार्यपद्धती बदलण्यासाठी, आपल्या संस्कृतीची नव्याने जडणघडण करण्यासाठी आणि इतर बरीच कामे करण्यासाठी पुढील दिशा दाखवली. काळानुरूप क्रमाक्रमाने टिकाऊ असे बदल करून, Uber ने आपल्या संस्कृतीची पुनर्बांधणी केली आहे आणि तिला नवीन स्वरूप दिले आहे. पाच वर्षांनंतर, आपण आता पाहत आहोत की कशाप्रकारे विविधता आम्हाला अधिक मजबूत बनवत आहे आणि जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे करण्याकरता एक अधिक समानतापूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यास सक्षम करत आहे.

आम्ही एका नवीन युगात आहोत जिथे कर्मचाऱ्यांकडे पर्याय आहेत आणि आम्ही आत्मसंतुष्ट होऊन आणि इतर लोक जे करत असतील त्याची फक्त नक्कल करू शकत नाही. सर्वात लक्षणीय सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही आमच्या सर्वात मौल्यवान मालमत्तेमध्ये, अर्थात आमच्या लोकांमध्ये केलेली गुंतवणूक. आपलेपणा, उद्दिष्ट, वाढ आणि विश्वासाची भावना वाढवणारे वातावरण निर्माण करण्यासाठी Uber सतत कार्य करते. या वर्षीचा रिपोर्ट तयार करत असताना, आमच्या लोकांचे आणि संस्कृतीचे स्वरूप ठरवणाऱ्या घटकांबद्दल सखोल माहिती देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले.

विविधतेबद्दल नेतृत्वाची वचनबद्धता

Uber मध्ये काम करणाऱ्या लोकांमधील विविधता वाढवणे आणि अधिक सक्रियपणे वर्णद्वेष-विरोधी असलेली कंपनी बनणे आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांच्या सहयोगाने काम करणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, आमची कार्यकारी नेतृत्व टीम लक्ष्ये निश्चित करून आणि त्यांच्या टीममधील प्रतिनिधित्वाच्या प्रगतीवर लक्ष ठेऊन आपली भूमिका निभावत आहे.

“मागील 5 वर्षांत असे काही क्षण आले आहेत जेव्हा प्रगती फारच संथ आणि अशक्य वाटत होती. पण मागे वळून पाहताना कळते की आमचा बदलाचा वेग थरारक आहे. हा प्रवास, विशेषत: आर्थिक, सामाजिक आणि बाजारपेठेतील सर्व बदल पाहता, अजिबात सरळ आणि सोपा नव्हता पण तो नक्कीच महत्त्वाचा होता. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही आमच्या मार्गात योग्य ते बदल करण्यासाठी नेहमीच तयार असतो. विशेषत: आता, जेव्हा जगाचे पूर्वीपेक्षा जास्त ध्रुवीकरण आणि ते अधिक अस्थिर झालेले असताना विविधता, समानता आणि समावेशन वाढवण्यासाठी कॉर्पोरेशन्सच्या भूमिकेचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे.

बो यंग ली, चीफ डी अँड आय ऑफिसर

“आम्ही कोणाला आकर्षित करतो आणि कायम राखतो यासह आमचे ध्येय आणि मूल्ये आम्हाला एक संस्था म्हणून प्रेरित करतात. आमची अशी इच्छा आहे की जे लोक आमच्या ध्येयाने प्रेरित आहेत आणि आमच्यासारखीच मूल्ये बाळगून आहेत, त्यांनी आमच्यात सामील व्हावे जेणेकरून ते त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कार्य करू शकतील आणि जगावर खरोखर प्रभाव टाकू शकतील. पण फक्त कागदावर आकर्षक ध्येय आणि सशक्त मूल्ये असणे पुरेसे नाही - ती आमच्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अनुभवात जिवंतपणे दिसली पाहिजेत. कर्मचार्‍यांना त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आमची मूल्ये अनुभवता यावीत, वैयक्तिक पातळीवर आणि आमच्या समुदायाचा भाग म्हणून त्यांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करता याव्यात याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण संस्थेमध्ये काम करत आहोत. आमच्या लोकांना आणि आमच्या व्यवसायाला भरभराटीस सक्षम करणार्‍या वातावरणाची रचना करण्यावर आम्ही खूप जास्त केंद्रित आहोत.”

निक्की कृष्णमूर्ती, चीफ पीपल ऑफिसर

आमचा कर्मचारी लोकसंख्या तपशील

Uber मध्ये, आम्ही आमच्या लोकसंख्याशास्त्रीय डेटाचा काळजीपूर्वक अभ्यास करतो आणि जागतिक स्तरावर महिलांचे तसेच अमेरिकेत वर्षानुवर्षे कमी प्रतिनिधित्व असलेल्या लोकांचे (युआरपी) प्रतिनिधित्व सुधारण्यासाठी स्वतःला जबाबदार मानतो. असे असले तरी, वाढते फायदे हे नेहमीच सरळसोट नसतात, पण आमच्या संचालक मंडळाच्या संयोगाने आम्ही निर्देशकांचे आणि संबंधित प्रगतीचे निरीक्षण करणे सुरू ठेवतो.

जागतिक प्रतिनिधित्व¹

कर्मचारी विविधता (जागतिक)

%पुरुष%महिला

कर्मचारी विविधता (यूएस)

%श्वेत
%आशियाई
%कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन
%हिस्पॅनिक किंवा लॅटिन
%बहुवंशीय
%हवाई आणि इतर पॅसिफिक बेटांवरील मूळ निवासी
%अमेरिकन भारतीय किंवा अलास्काचे मूळ निवासी

कर्मचारी विविधता (प्रादेशिक)

%पुरुष%महिला

नेतृत्वातील प्रतिनिधित्व

कर्मचारी विविधता (जागतिक)¹

%पुरुष%महिला

कर्मचारी विविधता (यूएस)²

%श्वेत
%आशियाई
%कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन
%हिस्पॅनिक किंवा लॅटिन
%बहुवंशीय
%हवाई आणि इतर पॅसिफिक बेटांवरील मूळ निवासी
%अमेरिकन भारतीय किंवा अलास्काचे मूळ निवासी

नवीन भर्तीमधील प्रतिनिधित्व

नवीन भर्तीमधील प्रतिनिधित्व

%पुरुष%महिला

नवीन भर्तीमधील वांशिक प्रतिनिधित्वानुसार %

%श्वेत
%आशियाई
%कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन
%हिस्पॅनिक किंवा लॅटिन
%बहुवंशीय
%हवाई आणि इतर पॅसिफिक बेटांवरील मूळ निवासी
%अमेरिकन भारतीय किंवा अलास्काचे मूळ निवासी

¹संख्या खालील तारखांवरील लोकसंख्याशास्त्रीय डेटा दर्शवतात: 31 डिसेंबर 2021 पर्यंत 2022; 31 मार्च 2021 पर्यंत 2021; 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 2020; 31 मार्च 2019 पर्यंत 2019. मागील वर्षांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या डेटाशी संबंधित अतिरिक्त माहिती संबंधित रिपोर्ट्समध्ये आढळू शकते. कालावधी आणि श्रेणींच्या व्याख्या यासह अधिक लोकसंख्याशास्त्रीय डेटासाठी, कृपया आमचा संपूर्ण पीपल अँड कल्चर रिपोर्ट पहा.

मागील पीपल अँड कल्चर रिपोर्ट्स

मनुष्यबळाचे व्यवस्थापन तसेच विविधता, समानता आणि समावेशन व संस्कृती यांबद्दलचा आमचा दृष्टिकोन मांडण्यासाठी आम्ही दरवर्षी आमचा पीपल अँड कल्चर रिपोर्ट प्रकाशित करत असतो. आम्ही प्रतिनिधित्वाबाबत अपडेट केलेला डेटा प्रकाशित करतो आणि आम्ही आमच्या उद्दिष्टांच्या दिशेने कशी प्रगती करत आहोत याची रूपरेषा देतो. आमचा कर्मचारी डेटा आणि मनुष्यबळ पद्धती यांमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या आमच्या दृष्टिकोनामध्ये हा रिपोर्ट एक महत्त्वाचा घटक आहे. मागील वर्षांचे संपूर्ण रिपोर्ट्स ॲक्सेस करण्यासाठी खालील लिंक्स पहा.

1/4