विविधता आणि समावेश
2020 हे एक ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. वांशिक अन्याय आणि कोविड-19 महामारीचे आव्हान समोर असताना, जागतिक सामूहिक चेतनेला कृतीसाठी मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले. Uber मध्ये आम्ही केवळ अंतर्गत-दृष्ट्या वंशभेदविरोधी कंपनी बनण्यासाठीच नव्हे, तर जगभरातील आमच्या समुदायांच्या बाह्य प्रगतीसाठीसुद्धा आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रतिसाद दिला.
आमच्या 2020 लोक आणि संस्कृती अहवालात आमच्या कर्मचार्यांच्या विविधतेबद्दलचा डेटा आहे. परंतु हे दीर्घकालीन व्यवस्थात्मक बदलांविषयीदेखील आहे, ज्यांची परिणती अधिक चांगले प्रतिनिधित्व आणि सामावलेपणाच्या भावनेत सुधारणा यामध्ये होते. आम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये वांशिक आणि सामाजिक समानता यांना केंद्रस्थानी ठेवून पुढे जाण्याशी असलेल्या आमच्या बांधिलकीचे हे प्रतिबिंब आहे.
Culture and belonging
आपण ज्या प्रकारे जगतो, काम करतो आणि ये-जा करतो, त्यात कोविड-19 ने आमूलाग्र बदल घडवून आणले. आमचे कर्मचारी ऑफिसऐवजी घरून कामकाजात स्थानांतरित झाल्यामुळे, आपुलकीची संस्कृती कशी व्यवस्थापित करावी याबद्दल नवीन विचार उद्भवले. त्यात पालक आणि काळजी घेणाऱ्यांसाठी कामाचे लवचिक पर्याय तयार करण्याचे एक नवीन धोरण समाविष्ट आहे, जेणेकरून ते त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांची काळजी घेणे आणि काम यांच्यात संतुलन साधू शकतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगवेगळी असल्याने आम्ही 3 व्यापक पर्याय तयार केलेः दिवसभर लवचिकता, कामाच्या तासांचे पुनर्वितरण आणि शिफ्टमध्ये बदल.
या व्यतिरिक्त, आम्ही आमचे मानसिक आरोग्य सहाय्य वाढवले. कर्मचार्यांना घरून काम करण्यासाठी स्टायपेंड देऊ केला आणि लोक दुरून काम करण्याच्या वातावरणाशी जुळवून घेत असताना पुनरावलोकनांवर नकारात्मक परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे मध्यवार्षिक कामगिरी पुनरावलोकन चक्र रद्द केले. Uber हे असे कामाचे ठिकाण असेल जिथे प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित आणि सुसज्ज केले जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठीची कृती करणे आम्ही सुरू ठेवू.
Social impact
जग थांबले, तसे - चलनवलनावर आधारलेला एक व्यवसाय असलेल्या आम्हाला - आम्ही कशी मदत करू शकतो हे माहीत होते. आमच्या कंपनीच्या इतिहासामध्ये प्रथमच, आम्ही लोकांना प्रवास थांबवण्यास आणि घरी राहण्यास सांगितले जेणेकरून जे सर्वात महत्त्वाचे आहे त्याची ने-आण आम्ही करू शकू: प्रथम प्रतिसादकर्ते (कामाच्या ठिकाणी) आणि खाद्य (ज्यांना त्याची गरज होती त्यांच्यासाठी).
रायडर्स त्यांचे काम करत असताना, आम्ही जगभरात आरोग्यसेवा कर्मचारी, विलगीकरण केलेले ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय साहित्याची गरज असलेले रुग्ण आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडलेले लोक अशा तातडीची गरज असलेल्या लोकांसाठी तब्बल 1 कोटी मोफत राइड्स, जेवण आणि डिलिव्हरीज करण्यासाठी वचनबद्ध होतो. केवळ पहिल्या 3 महिन्यांतच Uber ने आपली वचनबद्धता दुप्पटीहून वाढवली आणि 2.3 कोटी विनामूल्य राइड्स, जेवणे आणि डिलिव्हरीज पुरवल्या.
डिलिव्हरी भागीदार आणि ड्रायव्हर्स या संकटात आपल्या समुदायांना मदत करत असताना, त्यांना सुरक्षित राहण्यास मदत करणे हे आमचे प्राधान्य होते. हे करण्यासाठी आम्ही मास्क आणि जंतुनाशक स्प्रे उपलब्ध केले आणि पुरवले. कोविड-19चे निदान झालेल्या किंवा स्व-विलगीकरण करण्यास सांगितले गेलेल्यांना आर्थिक सहाय्य केले आणि ड्रायव्हर्सना आमच्या प्लटफॉर्मवर किंवा त्या बाहेर इतर काम शोधण्यात मदत केली. जसजशी शहरे पुन्हा उघडण्यास सुरुवात होत आहे, तसतसे आम्ही महामारीने ग्रस्त लोकांना सहाय्य करत राहू आणि जगाला पुन्हा सुरक्षितपणे चलनवलन करण्यासाठी मदत करू.
Corporate leadership
आम्ही आमच्या वांशिक समानता वचनबद्धतेबाबत कार्य करू हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही स्थापित केलेली एक जबाबदार यंत्रणा म्हणजे रेशियल इक्विटी लीडरशिप कौन्सिल (आरइएलसी). आमची उत्पादने, सेवा आणि समर्थनांमध्ये अंतर्गत व बाह्यदृष्ट्या वांशिक समानता निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करण्यास ही सुकाणू समिती जबाबदार आहे. 2019 मध्ये, आमच्या कंपनीच्या नेतृत्वाला या महत्त्वपूर्ण कार्यासाठी जबाबदार धरणे सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही आमच्या कार्यकारी मंडळाची मिळकतदेखील आमच्या डी आणि आय ध्येयांशी निगडीत केली. 2020 साठी आम्ही नेतृत्वात प्रतिनिधित्व वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आणि काही सकारात्मक प्रगती, विशेषत: महिलांसाठी दिसून आली - तसेच कमी प्रतिनिधित्व असलेल्यांच्या संख्येत थोडीशी वाढ दिसून आली.
“चलनवलनाला सामर्थ्य देणारी कंपनी म्हणून, प्रत्येकजण शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकेल हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. संपूर्ण समाजात कायम असलेल्या वंशविद्वेषाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि आमच्या कंपनीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समानतेचे समर्थक बनण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी आहोत. ”
दारा खोसरोशाही, मुख्य कार्यकारी अधिकारी, Uber
“आमचा ठाम विश्वास आहे की इतिहास आपल्याला घडवू शकतो, परंतु तो आपल्याला परिभाषित करत नाही. Uber व्यवसाय करण्याच्या नवीन पद्धती निश्चित करण्यास वचनबद्ध आहे, ज्या पक्षपाती तर नसतीलच, शिवाय सक्रियपणे अधिक समानता तयार करतील.”
बो यंग ली, मुख्य विविधता आणि समावेश अधिकारी, Uber
आमचा कर्मचारी डेटा
मागील 2 वर्षातील आमच्या कर्मचार्यांच्या प्रतिनिधित्वाचे बारकाईने निरीक्षण खाली केले आहे.¹
चार्ट्स | जागतिक लिंग आणि यूएस वंश/वांशिक प्रतिनिधित्व
Global gender representation
US race and ethnicity representation²
Gender by region
चार्ट्स | आमचे नेतृत्व प्रतिनिधित्व⁴
Global gender representation
यूएस वंश / वांशिक प्रतिनिधित्व⁵
लोक आणि संस्कृती अहवालाच्या पान 35 आणि 36 वरील यूएसमधील वंशानुसार लिंग प्रतिनिधित्व चार्ट्स पहा.
चार्ट | आमच्या नवीन कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व⁶
Global gender representation
यूएस वंश / वांशिक प्रतिनिधित्व⁷
लोक आणि संस्कृती अहवालाच्या पान 37 आणि 38 वर आमच्या यूएसमधील नवीन कर्मचाऱ्यांच्या वांशिक प्रतिनिधित्वानुसार लिंगासाठीचे चार्ट्स पहा.
¹वर्तमान प्रतिनिधित्व डेटा मार्च 2019 आणि ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.
²राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.
³आमच्या सहाय्यक कर्मचार्यांमध्ये (ज्यांना सामान्यत: उद्योगाच्या भाषेत ग्राहक सेवा कर्मचारी म्हणून संबोधले जाते) आमच्या उत्कृष्टता केंद्रांमधील आणि ग्रीनलाइट हब्जमधील समुदाय तज्ज्ञांचा समावेश आहे.
⁴नेतृत्वाची व्याख्या संचालक आणि त्यावरील लोक अशी केली जाते.
⁵राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.
⁶नवीन कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधित्व डेटा ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.
⁷ राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.