Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कृती करण्याचे वर्ष

Uber च्या सुरुवातीच्या दिवसांपासून, “बटण टॅप करा आणि राईड मिळवा” या सध्या संवादामुळे लोकांचे जीवन बदलले आहे. आणि आता तो संबंध आणखी प्रगाढ झालेला आहे. Uber मध्ये, जगाची हालचाल आणखी चांगली होण्यासाठीच्या उपायांची आम्ही नव्याने कल्पना करत असतो. प्रत्येकाने शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मुक्तपणे आणि सुरक्षितपणे हालचाल करण्यास सक्षम असले पाहिजे, यावर आमचा विश्वास आहे. ते करण्यासाठी, आम्ही आमच्या कंपनीमध्ये आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर, दोन्ही ठिकाणी वंशविद्वेषाविरुद्ध लढले पाहिजे आणि संपूर्ण समानतेच्या संधींसाठी उभे राहिले पाहिजे. एक अधिक सुरक्षित, अधिक समावेशक कंपनी तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि आम्ही सेवा देत असलेल्या सर्व समुदायांचा खंदा सहयोगी बनण्यासाठी आम्ही आपली जागतिक पोहोच, आपले तंत्रज्ञान, आपला डेटा आणि महत्त्वाचे म्हणजे आपला आवाज वापरला पाहिजे.

2020 हे वर्ष अविश्वसनीयरित्या आव्हानात्मक होते कारण Uber व एकूणच समाजाला एका महामारीमुळे उद्भववलेल्या आरोग्यविषयक आणि आर्थिक संकटांशी झगडावे लागले आणि जगाला वर्णभेदाचीही किंमत मोजावी लागली. कोविडमुळे बराच काळ समाजात टिकून राहिलेल्या असमानता तीव्रतेने समोर येत असताना हे लक्षात आले की याचे विनाशकारी परिणाम सर्वांना एकसारखे जाणवले नाहीत. हे सगळे होत असताना, Uber ने आमचे कर्मचारी, आमची शहरे आणि रायडर्स, ड्रायव्हर्स, डिलिव्हरी व्यक्ती आणि आमचा प्लॅटफॉर्म वापरणारे रेस्टॉरंट्स आणि व्यापारी, या सर्वांना काम आणि व्यापारासह जोडण्यास सहाय्य करण्यासाठी सतत काम केले आहे.

विविधतेबद्दल नेतृत्वाची वचनबद्धता

आमचे सीईओ दारा खोसरोशाही यांनी 2021 साठी संपूर्ण कंपनीकरता नेमून दिलेल्या 6 प्राधान्यांपैकी एक म्हणजे समानतेसाठी अधिक संधी तयार करणे. याचा अर्थ आहे Uber मध्ये काम करणाऱ्या लोकांमधील विविधता वाढवणे आणि अधिक सक्रियपणे वंशवाद-विरोधी असलेली कंपनी बनणे आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांच्या सहयोगाने काम करणे. हे वास्तवात आणण्यासाठी कार्यकारी नेतृत्व टीममधील प्रत्येक सदस्य आपली भूमिका निभावत आहे, संपूर्ण संघटनेचे बळ त्यांच्या पाठीशीे आहे याची विशेषत्वाने खातरजमा करत आहेत. विविधता वाढवणे, समानतेच्या संधी प्रदान करणे आणि समावेशकता हे कंपनीच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याबद्दलच्या वचनबद्धतेला आम्ही सर्वोच्च स्थान देतो.

बो यंग ली, मुख्य विविधता आणि समावेश अधिकारी

"प्रगती होण्यास वेळ लागतो हे आम्ही जाणतो, पण उपाययोजनांचा अभाव हे आमचा वेग कमी असण्याचे कारण नसते. जेव्हा कंपन्या वचनबद्धतेस जागण्याचे आणि वंशविद्वेष आणि श्वेत सर्वश्रेष्ठतेच्या वर्तनाविरूद्ध भूमिका घेण्याचे धैर्य दाखवत नाहीत तेव्हा त्या प्रगती करण्यात कमी पडतात. जलदगतीने बदल झाले नाहीत तर व्यक्ती आणि कंपनी, दोन्हींमधील ऊर्जा नाहीशी होते. मात्र क्रमाक्रमाने होत गेलेले परिवर्तन सर्वाधिक टिकाऊ ठरते. विषमता आणि वंशविद्वेष एका रात्रीत उदयास आले नाहीत आणि त्यांना साध्यासोप्या उपायांनी नष्ट देखील करता येणार नाही. काम कधीच संपत नसते. आपण समर्पितपणे काम करत राहिल्यास निश्चितच बदल घडेल असा माझा विश्वास आहे. Uber ने दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या कृतींबद्दल वचनबद्धता राखण्याचे धैर्य नेहमीच दाखवले आहे आणि माझ्या मते हेच प्रारंभिक यश आहे.

"आपण अतिशय अभूतपूर्व अशा काळात जगत आहोत. आपण परिवर्तनासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचे निश्चित करूया."

दारा खोसरोशाही, मुख्य कार्यकारी अधिकारी

“चलनवलनाला सामर्थ्य देणारी कंपनी म्हणून, प्रत्येकजण शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मुक्तपणे आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकेल हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. ते करण्यासाठी आपण कंपनीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, संपूर्ण समाजात कायम असलेल्या वंशविद्वेषाविरुद्ध लढा देण्यास आणि समानतेचे समर्थक बनण्यास मदत केली पाहिजे.

“आम्हाला एक गोष्ट स्पष्ट आहे: आमची केवळ उत्पादनेच समानता आणि न्यायपूर्णता सुधारतील अशी आम्ही फक्त आशा करून चालणार नाही. तर आम्ही आपला जागतिक विस्तार, आपले तंत्रज्ञान आणि आपला डेटा जलद बदल घडवण्यात मदत करण्यासाठी वापरणे आवश्यक आहे - जेणेकरुन आम्ही अधिक सक्रियपणे वंशविद्वेष विरोधी कंपनी, एक सुरक्षित, अधिक समावेशक कंपनी आणि प्लॅटफॉर्म बनू आणि आम्ही सेवा देत असलेल्या सर्व समुदायांचा विश्वासू सहकारी बनू.”

Uber चे कर्मचारी संसाधन गट सदस्यांसाठी नेतृत्व विकास संधींव्यतिरिक्त अस्मिता आणि आंतर-विभागीयता विषयी जागरूकता प्रदान करतात.

Able at Uber

Uber’s community for caregivers and employees living with disabilities

Asian at Uber

Uber चा आशियाई समुदाय

Black at Uber

कृष्णवर्णीय कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

Equal at Uber

सामाजिक-आर्थिक समावेशासाठी Uber चा समुदाय

Immigrants at Uber

स्थलांतरितांसाठी Uber चा समुदाय

Interfaith at Uber

विविध आध्यात्मिक श्रद्धा आणि संस्कृतींच्या लोकांसाठी Uber चा समुदाय

Los Ubers

हिस्पॅनिक आणि लॅटिनिक्स कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

Parents at Uber

पालक आणि काळजी घेणाऱ्यांसाठी Uber चा समुदाय

Pride at Uber

एलजीबीटीक्यू+ समावेश आणि विविधतेसाठी Uber चा समुदाय

Sages at Uber

सर्व पिढ्यांच्या कर्मचार्‍यांसाठी Uber चा समुदाय

Veterans at Uber

निवृत्त सैनिकांसाठी Uber चा समुदाय

Women at Uber

महिलांसाठी Uber चा समुदाय

आमचा कर्मचारी लोकसंख्या तपशील

मागील 3 वर्षांतील आमच्या कर्मचारी प्रतिनिधित्वाचे बारकाईने निरीक्षण खाली केले आहे.

तक्ते | जागतिक लिंग आणि यूएस वंश/वांशिक प्रतिनिधित्व

कर्मचारी विविधता (जागतिक)¹

%Men%Women

कर्मचारी विविधता (यूएस)²

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

कर्मचारी विविधता (प्रादेशिक)

%Men%Women

चार्ट्स | आमचे नेतृत्व प्रतिनिधित्व⁴

कर्मचारी विविधता (जागतिक)¹

%Men%Women

कर्मचारी विविधता (यूएस)²

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

पीपल अँड कल्चर रिपोर्टच्या पृष्ठ 22 ते 25 पर्यंत यूएसमधील लिंगाधारित वांशिक प्रतिनिधित्वाचे तक्ते पहा.

2021 चा संपूर्ण अहवाल पहा

तक्ता | आमच्या नवीन नोकरभर्तीचे प्रतिनिधीत्व⁵

नवीन नोकरभर्तीचे प्रतिनिधित्व

%Men%Women

% नुसार नवीन नोकरभर्तीचे वांशिक प्रतिनिधित्व

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

पीपल अँड कल्चर रिपोर्टच्या पृष्ठ 27 वर यूएसमधील आमच्या नव्या नोकरभर्तीमध्ये लिंगाधारित वांशिक प्रतिनिधित्वाचे तक्ते पहा.

2021 चा संपूर्ण अहवाल पहा

¹मार्च 2019, ऑगस्ट 2020 आणि मार्च 2021 पर्यंत कर्मचारी प्रतिनिधित्व डेटा. कृपया सखोल परिभाषांसाठी 2021 पीपल अँड कल्चर रिपोर्टची पीडीएफ आवृत्ती पहा.

²स्वतःहून वंश/वांशिकता न सांगितलेल्या कर्मचाऱ्यांना या प्रतिनिधित्व टक्केवारीमधून वगळले आहे. या आकड्यांसाठी विभाजक आहे “निवडलेल्या संघटनेमधील एकूण पुरुष आणि स्त्रिया.”

³गणनेत आमच्या उत्कृष्टता केंद्र आणि ग्रीनलाइट हब केंद्रांवर समुदाय तज्ञ असलेले आमचे सहाय्यक कर्मचारी (ज्यांना सामान्यत: उद्योगाच्या भाषेत ग्राहक सेवा कर्मचारी म्हणून संबोधले जाते) समाविष्ट आहेत.

⁴गणनेत कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन पातळी 7 आणि त्यावरील समाविष्ट आहेत.

⁵2020 चा नवीन नोकरभर्ती प्रतिनिधित्त्व डेटा ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे आणि 2021 चा नवीन नोकरभर्ती प्रतिनिधित्त्व डेटा एप्रिल 2020 ते मार्च 2021 पर्यंतचा आहे.

EEO-1 अहवाल

युनायटेड स्टेट्स

विविधता आणि समावेश अहवाल

1/3