Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ओ'हेअर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (ORD)

पारंपरिक शिकागो ओहेयर एयरपोर्ट शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्ही ओ'हेअरहून नेव्ही पिअरला जात असा किंवा क्लाउड गेटवरून एअरपोर्टला, तुम्हाला परिचित असलेल्या Uber ॲपसह तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून ORD येथे जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.

शिकागो, IL 60666
+1 800-832-6352

search
कुठून?
Navigate right up
search
कुठे जायचे?

जगभरात राईडची विनंती करा

आता एक बटण टॅप करून 700 हून अधिक प्रमुख केंद्रांवर एअरपोर्ट वाहतूक मिळवा.

एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अपरिचित शहरात रस्ते शोधावे लागणार नाहीत.

Uber सह घरच्यासारखे निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, रिअल-टाइम किंमत आणि कॅश फ्री पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

ओ'हेअर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथे पिकअप (ORD)

राईडची विनंती करण्यासाठी तुमचे अ‍ॅप उघडा

जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा तुमच्या अंतिम ठिकाणाकडे जाण्यासाठी राईडची विनंती करण्यासाठी Uber ॲप उघडा. तुमच्या समूहाचा आकार आणि सामानाच्या गरजा भागवणारा शिकागो ओहेयर वाहतूक पर्याय निवडा.

टर्मिनलमधून बाहेर पडा

तुम्हाला ORD पिकअप पॉइंट्सबद्दल थेट ॲपमध्ये दिशानिर्देश मिळतील. पिकअप लोकेशन्स टर्मिनल आणि उत्पादनानुसार बदलू शकतात.

बहुतेक विनंत्यांसाठी, टर्मिनल 2 च्या प्रस्थान लेव्हलवर तुम्ही तुमच्या राईडशेअर ड्रायव्हरला भेटाल.

ORD वर Uber Black किंवा SUV ची विनंती करण्यासाठी, कृपया कोणत्याही टर्मिनलच्या आगमन लेव्हलवर तुमच्या ड्रायव्हरला भेटा.

तुमच्या लोकेशनची पुष्टी करा

ॲपद्वारे निर्दिष्ट केल्यानुसार तुमचे टर्मिनल आणि ORD पिकअप लोकेशन निवडा. कृपया नोंद घ्या: हे लोकेशन नेहमी तुमच्या सर्वांत जवळच्या बाहेर पडण्याच्या दाराजवळ असेलच असे नाही.

तुमच्या ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि कारचा रंग ॲपमध्ये दिसेल. गाडीत बसण्यापूर्वी तुमच्या राईडची पडताळणी करा. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

शिकागो ओहेयर एयरपोर्ट नकाशा

ORD एअरपोर्टवर 4 प्रवासी टर्मिनल्स आहेत—टर्मिनल्स 1, 2, 3 आणि 5—ज्यामध्ये एकूण 191 दरवाजे आहेत. टर्मिनल 5 सर्व आंतरराष्ट्रीय आगमने हाताळते.

ओ'हेअर नकाशा

रायडर्सचे प्रमुख प्रश्न

  • होय. जगभरातील या एअरपोर्ट्सच्या यादीवर जा जिथे तुम्ही Uber सह राईडची विनंती करू शकता.

  • ORD पर्यंत (किंवा पासून) Uber ट्रिपचा खर्च तुम्ही विनंती केलेल्या राईडचा प्रकार, ट्रिपचे अंदाजे अंतर आणि कालावधी, टोल्स आणि राईड्ससाठी सध्याची मागणी यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो.

    विनंती करण्यापूर्वी तुम्ही येथे जाऊन आणि तुमचे पिकअप स्थान आणि अंतिम ठिकाण टाकून भाड्याचा अंदाज पाहू शकता. त्यानंतर, तुम्ही राईडची विनंती करता तेव्हा तुम्हाला रिअल-टाइम घटकांवर आधारित तुमचे वास्तविक भाडे ॲपमध्ये दिसेल.

  • पिकअपची लोकेशन्स तुम्ही विनंती केलेल्या राईडचा प्रकार आणि एअरपोर्टचा आकार यावर अवलंबून असू शकतात. तुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे याबद्दल ॲपमधील सूचना पाळा. तुम्ही एअरपोर्टवर निश्चित केलेले राईडशेअरिंग झोन्स दाखवणारी चिन्हेदेखील शोधू शकता.

    तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

  • शिकागो ओ'हेअर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट एकेकाळी ऑर्चर्ड प्लेस नावाचा विमान कारखाना होता, ज्यावरून ORD एअरपोर्ट कोड तयार झाला.

अधिक माहिती

  • Uber सह गाडी चालवताय?

    रायडर्सना कुठून पिकअप करायचे यापासून ते स्थानिक नियम आणि कायदे पाळण्यापर्यंत, तुमच्या एअरपोर्ट ट्रिप्स अधिक चांगल्या कशा करता येतील ते शोधा.

  • वेगळ्या एअरपोर्टवर जात आहात का?

    जगभरातील 700 पेक्षा अधिक एअरपोर्ट्सवर ड्रॉप ऑफ आणि पिकअप मिळवा.

1/2

ओ'हेअर एअरपोर्टची अतिथी माहिती

ओ'हेअर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (ORD) हा जगातील 6 वा सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे, जो दरवर्षी सुमारे 80 दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवतो. डाउनटाउन शिकागो आणि लेक मिशिगनच्या किनार्‍यापासून ओ'हेअर आदर्श रस्ता आणि रहदारीच्या परिस्थितीत 16 मैल (26 किलोमीटर)—गाडीने सुमारे 35 मिनिटांच्या अंतरावर आहे.

ORD एअरपोर्ट टर्मिनल्स

ORD मध्ये 4 टर्मिनल्स आहेत: टर्मिनल 1, टर्मिनल 2, टर्मिनल 3 आणि टर्मिनल 5. शिकागो एअरपोर्ट लाउंजेस सर्व टर्मिनल्सवर आहेत. खालील माहिती वापरून तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता.

ORD टर्मिनल 1

  • ऑल निप्पोन
  • लुफ्थांसा
  • युनायटेड
  • युनायटेड क्लब आणि पोलारिस लाउंज

ORD टर्मिनल 2

  • एअर कॅनडा
  • अलास्का
  • जेटब्ल्यू
  • युनायटेड क्लब

ORD टर्मिनल 3

  • अमेरिकन
  • केप एअर
  • कंटूर एअरलाइन्स
  • डेन्व्हर एअर कनेक्शन/की लाइम
  • आयबेरिया
  • जपान
  • सदर्न एअरवेज एक्सप्रेस
  • स्पिरीट
  • अमेरिकन एअरलाईन्स ॲडमिरल्स क्लब आणि फ्लॅगशिप लाउंज

ORD टर्मिनल 5

  • एअर लिंगस
  • एरोमेक्सिको
  • एअर फ्रान्स
  • एअर इंडिया
  • एअर न्यूझीलँड
  • ऑल निप्पोन
  • ऑस्ट्रियन
  • ब्रिटिश एअरवेज
  • कॅथे पॅसिफिक
  • कोपा
  • डेल्टा
  • एमिरेट्स
  • एतिहाद
  • इथिओपियन
  • ईव्हीए एअर
  • फिनएअर
  • फ्रंटियर
  • आईसलँडएअर
  • केएलएम रॉयल डच
  • कोरियन एअर
  • एलओटी पोलिश
  • कतार
  • रॉयल जॉर्डनियन
  • स्कॅन्डिनेव्हियन
  • साउथवेस्ट
  • सन कंट्री
  • स्विस
  • टीएपी एअर पोर्तुगाल
  • टर्किश
  • व्हिवाएरोबस
  • व्होलारिस
  • वेस्टजेट
  • डेल्टा स्काय क्लब
  • एसएएस लाउंज
  • स्विसपोर्ट लाउंज

ORD आंतरराष्ट्रीय टर्मिनल

ओ'हेअर एअरपोर्टच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी बोर्डिंग आणि आगमने प्रामुख्याने टर्मिनल 5 मध्ये आढळू शकतात, परंतु काही आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स टर्मिनल्स 1 आणि 3 वरून उड्डाण करतात.

मल्टी मोडल सुविधा (एमएमएफ)

मल्टी मोडल सुविधा (एमएमएफ): 10255 डब्ल्यू. झेम्के बुलेव्हार्ड, शिकागो, आयएल 60666 येथील मल्टी मोडल सुविधा (एमएमएफ किंवा इकॉनॉमी पार्किंग लॉट एफ) ही आता प्रादेशिक बसेससाठी पिकअप केंद्र आहे ज्यात यांचा समावेश आहे:

  • कोच यूएसए / व्हॅन गॅल्डर
  • एक्सप्रेस एअर कोच (ईएसी)
  • लाफायेट लिमो
  • पीओरिया चार्टर कोच
  • रेनडिअर शटल
  • विस्कॉन्सिन कोच यूएसए

ORD एअरपोर्टवर जेवण

कॅफेज, बार्स, फास्ट फूड चेन्स आणि टेबल सर्व्हिस असलेल्या शिकागो एअरपोर्ट रेस्टॉरंट्ससह 135 पेक्षा जास्त शिकागो एअरपोर्ट खाद्यपदार्थांचे पर्याय संपूर्ण एअरपोर्टवर उपलब्ध आहेत. प्रवाशांना ORD वर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळू शकतात, ज्यात सुशी, मेडिटरेनियन खाद्यपदार्थ, कुकीज, पॉपकॉर्न, कॅलिफोर्निया स्टाइलचे खाणे, नियापोलिटन पिझ्झा आणि बरेच काही समाविष्ट आहे.

ORD एअरपोर्टच्या आसपास फिरणे

प्रवासी फिरण्यासाठी एअरपोर्ट ट्रान्झिट सिस्टम (एटीएस) नावाची शिकागो एअरपोर्ट परिवहन सिस्टम वापरू शकतात. हे 2.5 मैल लांब ऑटोमेटेड पीपल मूव्हर (4 किलोमीटर) 24 तास काम करते, सर्व 4 टर्मिनल्स आणि रिमोट पार्किंग लॉट्सना जोडते. प्रत्येक टर्मिनलवर स्टेशन्स स्पष्टपणे चिन्हांकित केली आहेत.

ORD एअरपोर्टवर करण्यासारख्या गोष्टी

शिकागो एअरपोर्टमध्ये विविध आकर्षणे आहेत ज्यामध्ये संपूर्ण एअरपोर्टवर असलेली शिल्पे, चित्रे, म्युरल्स आणि प्रदर्शनांचा समावेश असलेला सार्वजनिक कला कार्यक्रम आहे. शिकागोच्या फील्ड म्युझियमकडून उधार घेतलेले 72 फूट लांब ब्रॅचिओसॉरस स्केलेटन मॉडेल (22 मीटर) टर्मिनल 1 च्या वरच्या लेव्हलवर कॉन्कोर्स बी येथे आहे. टर्मिनल 3 रोटुंडामध्ये अर्बन गार्डनच्या बाजूला एक बांबूच्या लाकडाची पर्यावरणपूरक फरशी, एका भिंतीवर फरशीपासून सिलिंगपर्यंत आरसा असलेला योगा कक्ष आणि व्यायामाच्या मॅट्स वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. शिकागो एअरपोर्ट दुकानांमध्ये न्यूजस्टँड्स आणि हाय-एंड फॅशन बुटीक्सचा समावेश आहे.

ORD एअरपोर्टवरील चलन विनिमय

ओ'हेअर येथील प्रवाशांसाठी चलन विनिमय कार्यालये खालील भागांमध्ये आहेत:

  • टर्मिनल 1: गेट्स बी9 आणि सी18
  • टर्मिनल 2: मुख्य हॉल
  • टर्मिनल 3: गेट के11
  • टर्मिनल 5: वरच्या आणि खालच्या लेव्हल्स

ORD एअरपोर्टजवळची हॉटेल्स

तुमचा एखादा लेओव्हर असो किंवा फ्लाइटला रात्रभराचा उशीर झालेला असो किंवा तुम्हाला ORD जवळ एखाद्या भेटीसाठी मुक्काम करायचा असो, जवळपासच्या परिसरात 30 पेक्षा जास्त हॉटेल्स आणि निवासी ठिकाणे आहेत, तसेच डाउनटाउन शिकागोमध्ये आणि आसपास निवडण्यासाठी बरीच हॉटेल्स आहेत.

ORD एअरपोर्टजवळची प्रेक्षणीय ठिकाणे

  • शिकागोचे मत्स्यालय
  • शिकागोचे आर्ट म्युझियम
  • मॅग्निफिसंट माइल
  • नेव्ही पियर
  • विलिस टॉवर

ORD एअरपोर्टबद्दल अधिक माहिती येथे मिळवा.

फेसबुक
इन्स्टाग्राम
ट्विटर

या पृष्ठावर Uber च्या नियंत्रणात नसलेल्या तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा तिच्या कामकाजाशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट केलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या व्यक्त किंवा सूचित हमी देण्यासाठी कोणत्याही प्रकारे तिच्यावर विसंबून राहू शकत नाही किंवा तिचा अर्थ लावला जाणार नाही किंवा तिचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.