Please enable Javascript
Skip to main content

किशोरांसाठी Uber गोपनीयता सूचना

ही सूचना, तुम्ही किशोरांसाठी Uberवापरता तेव्हा आम्ही गोळा करत असलेल्या वैयक्तिक डेटाचे (“डेटा”) संबंधित माहिती , तसेच आम्ही तो कसा वापरतो आणि शेअर करतो आणि तुमच्या डेटाबाबत तुमचे अधिकार आणि निवड हे तपशील प्रदान करते. तुम्ही ही सूचना तुमचे गार्डियन किंवा तुमचे पालक (“पालक”) यांच्यासह वाचावी. तुम्ही Uber ची संपूर्ण गोपनीयता सूचना येथे वाचू शकता.

खाली देश विशिष्ट मार्गदर्शन विभागामध्ये सूचित केले असल्यास अन्यथा, या सूचनेमध्ये वर्णन केलेल्या पद्धती, किशोरांसाठी Uber जेथे Uber प्रदान करते, तेथे त्या लागू होतात.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्याशी येथेसंपर्क साधू शकता .तुम्ही Uber च्या गोपनीयता पद्धतींबद्दल अधिक माहिती देखील Uber च्या गोपनीयता केंद्रमध्ये पाहू शकता , जे तुम्हाला Uber अ‍ॅप्समधील गोपनीयता मेनूमध्ये देखील आढळेल.

1. Uber कोणती माहिती गोळा करते आणि ती कधी गोळा केली जाते ?

2. Uber माझा डेटा कसा वापरते?

3. Uber माझा डेटा माझ्या पालकांसोबत शेअर करते का?

4. Uber माझा डेटा इतर कोणासोबत शेअर करते का?

5. Uber माझा डेटा वैयक्तिकृत जाहिरातींसाठी वापरेल का?

6. माझा डेटा कसा वापरला जातो हे नियंत्रित करण्यासाठी Uber सेटिंग्ज प्रदान करते का?

7. माझ्या डेटासंबंधित माझे कोणते अधिकार आहेत?

8. माझ्या डेटासाठी डेटा नियंत्रक कोण आहे?

9. मी Uber च्या डेटा संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क कसा साधू शकतो?

10. माझ्या डेटावर कुठे प्रक्रिया केली जाईल?

11. Uber माझा डेटा किती काळ राखून ठेवेल?

12. या गोपनीयता सूचनेवरील अपडेट्स

13. देशासाठी विशिष्ट मार्गदर्शन

1. Uber कोणती माहिती गोळा करते आणि ती कधी गोळा केली जाते ?

तुम्ही किंवा तुमचे पालक यांनी आम्हाला प्रदान केलेला डेटा आम्ही गोळा करतो. यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • खाते माहिती: हा डेटा , जसे की तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि फोन नंबर, पासवर्ड आणि पेमेंट माहिती ,आम्हाला किशोरांसाठी Uber खाते तयार करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी आवश्यक आहे.

  • वय: तुम्ही किशोरांसाठी Uber वापरण्यास पात्र आहात याची खात्री करण्यासाठी आम्ही तुमचे वय आणि जन्मतारीख हे तपशील घेतो .

  • कस्टमर सहाय्य डेटा: तुम्ही किंवा तुमचे पालक आमच्या ग्राहक सहाय्य टीमशी संपर्क साधता तेव्हा आम्ही तुमच्याकडून डेटा गोळा करतो जेणेकरून Uber वापरताना तुम्हाला आलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू शकू. यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी Uber सहाय्याशी संपर्क साधताना दिलेल्या कोणत्याही माहितीचा समावेश आहे, जसे की आमच्या सहाय्य कार्यसंघासह चॅट संदेश किंवा कॉल रेकॉर्डिंग.

  • रेटिंग्ज आणि अभिप्राय: तुम्ही तुमच्या ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींबद्दल किंवा त्यांनी तुमच्याबद्दल दिलेली रेटिंग्ज आणि अभिप्राय आम्ही गोळा करतो. तुम्हाला रेटिंग्जबद्दल अधिक माहिती येथे मिळू शकते . तुम्ही Uber अ‍ॅपमधील खाते मेनू अंतर्गत तुमचे रेटिंग पाहू शकता.

  • सर्वेक्षण प्रतिसाद.

तुम्ही किशोरांसाठी Uber वापरताना देखील आपोआप डेटा गोळा होतो . यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • लोकेशन डेटा: तुम्ही राईडची विनंती केल्यास, आम्ही तुमच्या ट्रिप दरम्यान तुमच्या ड्रायव्हरचे लोकेशन ट्रॅक करतो आणि तो डेटा तुमच्या खात्याशी लिंक करतो. यामुळे आम्हाला तुमच्या ट्रिपवर तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला आणि तुमच्या पालकांना दाखवता येते.

    आम्ही तुमचे अंदाजे लोकेशन देखील निर्धारित करतो आणि तुम्ही आम्हाला तुमच्या फोनवरील सेटिंग्जमधून तसे करण्याची परवानगी दिल्यास आम्ही तुमचे अचूक लोकेशन निर्धारित करू शकतो. तुम्ही तसे केल्यास, तुम्ही राईड किंवा ऑर्डरची विनंती केल्यापासून राईड पूर्ण होईपर्यंत किंवा तुमची ऑर्डर डिलिव्हर होईपर्यंत आम्ही तुमच्या अचूक लोकेशनची माहिती घेत राहू. तुमच्या फोनच्या स्क्रीनवर Uber अ‍ॅप उघडलेले असताना देखील आम्ही अशा प्रकारचा डेटा गोळा करतो.

    आम्हाला तुमच्या अचूक लोकेशनची माहिती घेऊ न देता देखील तुम्ही Uber वापरू शकता. परंतु , हे तुमच्यासाठी कमी सोयीस्कर असेल , कारण अशा वेळी, आम्हाला तुम्हाला शोधण्याची परवानगी न देता तुम्हाला तुमचे लोकेशन तुमच्या फोनमध्ये टाइप करावे लागेल.

  • ट्रिप आणि ऑर्डर माहिती: तुम्ही विनंती केलेल्या ट्रिप्स आणि डिलिव्हरीजशी संबंधित डेटा आम्ही गोळा करतो. यामध्ये तुमच्या ट्रिप्ससाठी पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ लोकेशन्स, तुम्ही डिलिव्हरीसाठी ऑर्डर केलेले आयटम्स, तुमच्या विनंती किंवा ऑर्डरची तारीख आणि वेळ, डिलिव्हरीचा पत्ता आणि दिलेली रक्कम यांचा समावेश आहे.

  • संदेशवहनाचा डेटा: तुम्ही Uber अ‍ॅप्सद्वारे तुमच्या ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्तीशी संपर्क साधता तेव्हा आम्ही डेटा गोळा करतो, जसे की कोणत्याही मेसेजेस किंवा फोन कॉल्सचा मजकूर (आम्ही फोन कॉल्स रेकॉर्ड करत आहोत असे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले असल्यास).

  • ऑडिओ रेकॉर्डिंग्ज: किशोरांसाठी Uber तुम्हाला तुमच्या ट्रिप्सचा ऑडिओ रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. तुम्ही हे वैशिष्ट्य चालू केल्यास, ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आपोआप जनरेट होतील आणि तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केल्या जातील.

  • डिव्हाइस डेटा: आम्ही आयपी पत्ता, डिव्हाइस आयडेंटिफायर्स आणि तुमची डिव्हाइस ऑपरेटिंग सिस्टम, सॉफ्टवेअर आणि प्राधान्ये यांच्याशी संबंधित माहिती तसेच आमच्या सेवा अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्ही वापरत असलेला फोन किंवा इतर डिव्हाइसेसचा डेटा गोळा करतो.

वर वर्णन केलेला काही डेटा गोळा करण्यासाठी आम्ही कोणत्या “कुकीज” आणि तत्सम तंत्रज्ञान वापरू शकतो हे तुम्ही Uber च्या सेवा कशा वापरता यावर अवलंबून आहे . या तंत्रज्ञानाच्या आमच्या वापराबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया Uber ची कुकी सूचना पहा .

2. Uber माझा डेटा कसा वापरते?

Uber, किशोरांसाठी Uber द्वारे ट्रिप्स किंवा डिलिव्हरीजची तुम्हाला विनंती करता यावी किंवा विनंती प्राप्त करता यावी यासाठी तुमचा डेटा वापरते. यामध्ये, तुमचे खाते तयार करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी, तुमच्या ड्रायव्हरला तुम्हाला पिकअप करण्यासाठी किंवा तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचवण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या राईड्स किंवा डिलिव्हरीज ट्रॅक करण्यासाठी, तुम्हाला ट्रिप किंवा डिलिव्हरी अपडेट्स देण्यासाठी आणि भाडे अंदाज लावण्यासाठी तुमचा डेटा वापरणे, हे सर्व समाविष्ट आहे .

आम्ही तुमचा डेटा खालील कारणांसाठी देखील वापरू शकतो:

  • सुरक्षा, सुरक्षितता आणि फसवणूक: यामध्ये, ट्रिप दरम्यान तुमचा लोकेशन डेटा तुमच्या पालकांसोबत शेअर करणे समाविष्ट आहे; तुमची ट्रिप तुम्ही विनंती केलेल्या ड्रॉप-ऑफला संपेल याची पडताळणी करण्यासाठी तुमचा लोकेशन डेटा वापरणे आणि तसे न झाल्यास तुमच्या पालकांना किंवा पोलिसांना सतर्क करणे; फसवणूक टाळण्यासाठी आणि फसवणूक होत आहे हे लक्षात येण्यासाठी खाते, स्थान आणि इतर माहिती वापरणे; ट्रिप किंवा डिलिव्हरीज दरम्यान सुरक्षा तज्ञांकडून थेट सहाय्य प्रदान करण्यासाठी तुमचे स्थान, खाते आणि ऑर्डर माहिती वापरणे; आणि Uber च्या नियम आणि अटींची आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी तुमचा (आणि तुम्ही संवाद साधलेल्या इतर Uber वापरकर्त्यांचा) डेटा वापरणे ,ह्यांचा समावेश आहे .
  • ग्राहक सहाय्य: तुम्ही किशोरांसाठी Uber वापरता तेव्हा, किंवा तुम्ही Uber च्या ग्राहक सहाय्य टीमशी संपर्क साधता तेव्हा, तुम्हाला आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमचा डेटा गोळा करतो आणि वापरतो.
  • संशोधन आणि विकास: यामध्ये ,तुम्ही आणि इतर लोक Uber कसे वापरता आणि Uber मध्ये कशी सुधारणा करता येईल हे समजून घेण्यासाठी आणि आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये विकसित किंवा सुधारित करण्यासाठी डेटा वापरणे, समाविष्ट आहे.
  • तुम्ही आणि तुमचा ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्ती यांच्यामध्ये संवाद सक्षम करणे: जेणेकरून तुम्ही ,तुमचा ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्तीशी, संपर्क साधू शकता, उदाहरणार्थ, तुमचे पिक-अप लोकेशन किंवा कार्समध्ये राहिलेल्या आयटम्स संबंधित संपर्क करण्यासाठी.
  • मार्केटिंग: तुम्हाला वापरण्यास आनंद होईल अशी Uber उत्पादने आणि सेवांबद्दल माहिती देण्यास आम्ही तुम्हाला संदेश पाठवण्यासाठी डेटाचा वापरतो .
  • कायदेशीर कार्यवाही आणि आवश्यकता: आम्ही आमच्या कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने डेटा वापरतो ज्यामध्ये, कायदेशीर कार्यवाही चालू असताना किंवा कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे विनंती केली असल्यास Uber च्या सेवांच्या वापराशी संबंधित दावे किंवा विवादांची चौकशी करणे,समाविष्ट आहे .

3. Uber माझा डेटा माझ्या पालकांसोबत शेअर करते का?

होय. ट्रिप्ससाठी, यामध्ये तुमचे पिक-अप आणि ड्रॉप ऑफ पत्ते, रिअल-टाइम लोकेशन, प्रवास केलेला मार्ग, भाडे आणि पेमेंट माहिती समाविष्ट असते. डिलिव्हरीजसाठी, यामध्ये तुमचे डिलिव्हरी स्थान, विनंती केलेले आयटम्स, भाडे आणि पेमेंट माहिती समाविष्ट असते.

4. Uber माझा डेटा इतर कोणासोबत शेअर करते का?

होय. यामध्ये हे शेअर केले जाते:

  • तुमच्या ड्रायव्हरसह, तुमचे नाव आणि तुमचे पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ लोकेशन.

  • तुम्ही ऑर्डर करत असलेल्या रेस्टॉरंट किंवा व्यापाऱ्यासह आणि तुमच्या डिलिव्हरी व्यक्तीसह, तुमचे नाव, ऑर्डर तपशील आणि डिलिव्हरी लोकेशन.

  • तुम्ही आमच्या ॲपमधील डेटा-शेअरिंग वैशिष्ट्ये वापरता तेव्हा तुम्ही शेअर करण्यासाठी निवडलेला डेटा, जसे की तुम्ही तुमची आगमनाची अपेक्षित वेळ (ETA) दुसऱ्या Uber वापरकर्त्यासोबत शेअर करता किंवा एखाद्या घटनेनंतर तुमची माहिती पोलीस, अग्निशमन किंवा आपत्कालीन सेवांसोबत शेअर करता.

  • Uber ला तुम्हाला त्यांच्या सेवा प्रदान करण्यात मदत करणाऱ्या सेवा प्रदात्यांसह आणि भागीदारांसह. यामध्ये आम्हाला पेमेंटवर प्रक्रिया करण्यात, डेटा स्टोअर करण्यात, ग्राहक सहाय्य प्रदान करण्यात आणि नकाशा सेवा सक्षम करण्यात , तुम्हाला वैयक्तिकृत न केलेल्या जाहिराती पाठविण्यात, सर्वेक्षण आणि संशोधन करण्यात, आमच्या सेवांची सुरक्षितता वाढविण्यात आणि विमा प्रदान करण्यात मदत करणाऱ्यांचा समावेश आहे. मेटा आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया कंपन्यांचा देखील यामध्ये समावेश आहे ज्यांचे टूल्स आम्ही आमच्या अ‍ॅप्स आणि वेबसाइट्समध्ये वापरतो आणि व्यावसायिक सेवा प्रदाते जसे की लेखापाल, सल्लागार आणि वकील यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

  • Uber च्या पूर्ण किंवा अंशतः मालकीच्या किंवा नियंत्रित असलेल्या कंपन्यांसह.

  • सरकारी संस्थांसह किंवा विमा दाव्यांसह कायदेशीर कार्यवाही किंवा विवादांच्या संबंधात कायदेशीर कारणांसाठी आवश्यक असलेला डेटा.

5. Uber माझा डेटा वैयक्तिकृत जाहिरातींसाठी वापरेल का?

नाही. तुम्ही किशोरांसाठी Uber वापरता तेव्हा तुम्हाला जाहिराती दिसू शकतात, परंतु त्या तुमच्यासाठी वैयक्तिकृत नसतात.

6. माझा डेटा कसा वापरला जातो हे नियंत्रित करण्यासाठी Uber काही सेटिंग्ज प्रदान करते का?

होय! Uber चे गोपनीयता केंद्र आणि सेटिंग्ज तुम्हाला Uber तुमचा डेटा कसा वापरतो हे नियंत्रित करण्याची परवानगी देतात. या सेटिंग्जमध्ये हे समाविष्ट आहे:

a. लोकेशन डेटा संकलन

तुमच्या फोनवरील सेटिंग्ज वापरून Uber तुमचा अचूक लोकेशन डेटा संकलित करू शकते की नाही हे तुम्ही निवडू शकता . तुम्ही गोपनीयता केंद्र मधील डिव्हाइस लोकेशन मेनूद्वारे त्या सेटिंग्जमध्ये प्रवेश करू शकता .

b. लाइव्ह लोकेशन शेअर करा

या सेटिंगद्वारे Uber तुमचे अचूक स्थान तुमच्या ड्रायव्हरसह किंवा डिलिव्हरी व्यक्तींसोबत शेअर करू शकते की नाही हे तुम्ही निवडू शकता . तुम्ही गोपनीयता केंद्र मधील लाइव्ह लोकेशन मेनूद्वारे या सेटिंगमध्ये प्रवेश करू शकता .

c. आपत्कालीन डेटा शेअरिंग

आपत्कालीन परिस्थितीत Uber तुमचा डेटा पोलिस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका सेवांसोबत शेअर करू शकतो की नाही हे या सेटिंगवरून तुम्ही निवडू शकता. तुम्ही गोपनीयता केंद्र मधील लाइव्ह लोकेशन मेनूद्वारे या सेटिंगमध्ये प्रवेश करू शकता .

d. नोटिफिकेशन्स: सूट आणि बातम्या

या सेटिंगमुळे तुम्हाला सूट आणि Uber कडून बातम्यांबद्दल ईमेल्स आणि पुश सूचना Uber तुम्हाला पाठवू शकते की नाही हे तुम्ही निवडू शकता . तुम्ही या सेटिंगमध्ये येथे प्रवेश करू शकता .

e. तृतीय-पक्ष अ‍ॅप अ‍ॅक्सेस

या सेटिंगद्वारे तुमचे Uber खाते ॲक्सेस करण्यासाठी परवानगी दिलेल्या तृतीय पक्ष ॲप्लिकेशन्सचे तुम्ही पुनरावलोकन करू शकता आणि तुम्हाला यापुढे नको असलेला कोणताही ॲक्सेस बंद करू शकता. तुम्ही त्या सेटिंगमध्ये येथे प्रवेश करू शकता .

7. माझ्या डेटासंबंधित माझे कोणते अधिकार आहेत?

तुम्ही तुमच्या डेटाशी संबंधित खालील अधिकार वापरण्यासाठी विनंत्या , Uber चे गोपनीयता केंद्र वापरून , Uber च्या अ‍ॅप्समधील गोपनीयता मेनूद्वारे आणि/किंवा खालील लिंक्स वापरून, येथे सबमिट करू शकता.

तुम्हाला जीडीपीआर तसेच डेटा संरक्षण कायदे लागू करण्यासाठी जबाबदार असलेल्या तुमच्या देशातील सरकारी एजन्सीकडे तक्रारी सबमिट करण्याचा अधिकार देखील तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून असू शकतो.

तुमची तक्रार Uber च्या युनायटेड स्टेट्समध्ये तुमच्या डेटाच्या प्रक्रियेशी संबंधित असल्यास, तुम्ही त्या तक्रारी Uber किंवा युनायटेड स्टेट्स फेडरल ट्रेड कमिशनकडे किंवा काही बाबतीत “लवाद कार्यवाही” नावाच्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे देखील करू शकता. अधिक माहितीसाठी, कृपया Uber ची गोपनीयता सूचना पहा.

a. डेटा अ‍ॅक्सेस आणि डेटा पोर्टेबिलिटीचे अधिकार

या अधिकारांतर्गत, तुम्ही Uber कडे तुमच्याबद्दल नक्की कोणता डेटा आहे ते पाहू शकता आणि तुम्हाला तुमच्या डेटाची प्रत द्यावी अशी विनंती करू शकता .

वरील पद्धतींव्यतिरिक्त, तुम्ही Uber अ‍ॅप्समध्ये तुमच्या खात्याची बरीचशी माहिती ॲक्सेस करू शकता किंवा आमचे तुमचा डेटा एक्सप्लोर करा हे वैशिष्ट्य वारंवार विनंती केलेल्या डेटाचा सारांश पाहण्यासाठी वापरू शकता , जसे की तुम्ही Uber युजर झाल्यापासून किती ट्रिप्स किंवा ऑर्डर्स घेतल्या आणि Uber युजर होऊन तुम्हाला किती दिवस झाले .

तुम्ही आमचे माझा डेटा डाउनलोड करा हे टूलदेखील वापरू शकता जेणेकरून तुमचे खाते, वापर, संप्रेषणे आणि डिव्हाइस डेटा तसेच डेटाची प्रत (पोर्टेबल फॉरमॅटमध्ये) तुम्हाला मिळवता येईल .

b. आक्षेप घेण्याचा अधिकार

या अधिकारांतर्गत , आम्ही तुमच्या सर्व किंवा काही डेटाचा वापर करणे थांबवावे किंवा तुमच्या डेटाचा आमचा वापर मर्यादित ठेवावा, अशी विनंती तुम्ही करू शकता. तुम्ही आक्षेप घेतल्यास, आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असल्यास किंवा कायद्यानुसार परवानगी असल्यास Uber तुमचा डेटा वापरणे सुरू ठेवू शकते.

c. सुधारणा करण्याचा अधिकार

या अधिकारांतर्गत तुम्ही Uber ला तुमच्याबद्दल असलेली कोणतीही चुकीची माहिती दुरुस्त करण्याची विनंती करू शकता.

d. विसरण्याचा अधिकार

या अधिकारांतर्गत तुम्ही Uber ला तुमचे खाते आणि आम्ही तुमच्याबद्दल गोळा केलेला डेटा हटवण्याची विनंती करू शकता. तुम्ही ती विनंती येथे किंवा वरील सूचनांचे पालन करून

सबमिट करू शकता .

8. माझ्या डेटासाठी डेटा नियंत्रक कोण आहे?

“डेटा नियंत्रक” म्हणजे तुमचा डेटा कसा गोळा करायचा, वापरायचा आणि संरक्षित कसा करायचा हे ठरवण्यासाठी जबाबदार असलेली कंपनी किंवा कंपन्या होय. तुम्ही युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम किंवा स्वित्झर्लंडमधील किशोरांसाठी Uber वापरता तेव्हा Uber Technologies Inc. (अमेरिकेत स्थित) आणि Uber BV (नेदरलँड्समध्ये स्थित) हे तुमच्या डेटासाठी डेटा नियंत्रक असतात.

तुम्ही इतर कुठेही किशोरांसाठी Uber वापरत असल्यास Uber Technologies Inc. हा डेटा नियंत्रक आहे.

9. मी Uber च्या डेटा संरक्षण अधिकार्याशी संपर्क कसा साधू शकतो?

Uber चा डेटा संरक्षण अधिकारी ("DPO") तुमचा डेटा गोळा करताना आणि वापरताना Uber ला युरोपियन युनियन आणि इतरत्र डेटा संरक्षण कायदे समजून घेण्यात आणि त्यांचे पालन करण्यात मदत करतो. तुम्ही कोणत्याही प्रश्नांसाठी Uber च्या डीपीओशी येथे, किंवा Uber BV वर मेलद्वारे संपर्क साधू शकता. (बर्गरवेशुईस्पॅड 301, 1076 एचआर ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स).

10. माझ्या डेटावर कुठे प्रक्रिया केली जाईल?

Uber जागतिक स्तरावर वापरकर्त्यांचा डेटा ऑपरेट करते आणि त्यावर प्रक्रिया करते. याचा अर्थ असा की तुमच्या वैयक्तिक डेटावर युनायटेड स्टेट्स तसेच इतर अशा देशांमध्ये प्रक्रिया केली जाईल, ज्यांचे डेटा संरक्षण कायदे तुम्ही जिथे राहता त्यापेक्षा वेगळे असू शकतात. जेव्हा आम्ही तुमच्या डेटावर तुम्ही राहता त्या ठिकाणाबाहेर प्रक्रिया करतो, तेव्हा आम्ही जीडीपीआर सारख्या डेटा संरक्षण कायद्यांच्या आवश्यकतेनुसार त्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी योग्य तो सुरक्षा उपाय प्रदान करतो.

त्या सुरक्षा उपायांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया Uber ची गोपनीयता सूचना पहा .

11. Uber माझा डेटा किती काळ राखून ठेवेल?

आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आणि या सूचनेमध्ये वर्णन केलेल्या इतर हेतूंसाठी Uber आवश्यक तोपर्यंत तुमचा डेटा राखून ठेवते. या हेतूंसाठी यापुढे आवश्यक नसल्यास, आम्ही तुमचा डेटा हटवतो.

तुम्ही तुमचे खाते हटवण्याची विनंती येथेकिंवा गोपनीयता केंद्रद्वारे करू शकता . तुम्ही खाते हटवण्याची विनंती केल्यास, कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी किंवा वर वर्णन केल्यानुसार इतर कायदेशीर कारणांसाठी डेटा लागला तरच, अन्यथा, आम्ही तुमचा डेटा हटवू.

12. या गोपनीयता सूचनेवरील अपडेट्स

आम्हाला ही सूचना अधूनमधून अपडेट करावी लागते .

आम्ही काही मोठे बदल केल्यास, आम्ही तुम्हाला Uber अ‍ॅप्सद्वारे किंवा ईमेलद्वारे अगोदरच कळवू.

13. देशासाठी विशिष्ट मार्गदर्शन

  • अर्जेंटिनामधील वापरकर्त्यांसाठी

    Uber डेटा संरक्षण कायद्यांतर्गत तुमच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही एजन्सी ऑफ ॲक्सेस टू पब्लिक इन्फॉर्मेशनकडे तक्रारी दाखल करू शकता.

  • ऑस्ट्रेलियामधील वापरकर्त्यांसाठी

    तुम्ही ऑस्ट्रेलियन गोपनीयता तत्त्वांच्या आमच्या अनुपालनाबद्दल Uber शी येथे संपर्क साधू शकता. याबाबत संपर्क साधला गेला तर Uber च्या ग्राहक सेवा आणि/किंवा संबंधित गोपनीयता कार्यसंघाद्वारे रास्त कालावधीत त्याची दखल घेतली जाईल. तुम्ही अशा अनुपालनाशी संबंधित समस्यांसाठी ऑस्ट्रेलियन माहिती आयुक्त कार्यालयाशी देखीलयेथे संपर्क साधू शकता.

  • ब्राझीलमधील वापरकर्त्यांसाठी

    ब्राझीलच्या सामान्य डेटा संरक्षण कायद्यांतर्गत (Lei Geral de Proteção de Dados - एलजीपीडी) आवश्यक असलेल्या Uber च्या गोपनीयता नियमावलीसंबंधित माहिती कृपया येथेपहा.

    कृपया “युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांसाठी” असलेला विभाग देखील पहा.

  • कोलंबिया, होंडुरास आणि जमैकामधील वापरकर्त्यांसाठी

    या सूचनेमध्ये वापरलेले “ड्रायव्हर्स” “लीजवर देणारा” म्हणून ओळखले जातात.

  • मेक्सिकोमधील वापरकर्त्यांसाठी

    कृपया मेक्सिकोच्या मेक्सिकन वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत (Ley Federal de Protección de Datos Personales en Posesión de los Particulares) आवश्यक असलेल्या Uber च्या गोपनीयता पद्धतींविषयीच्या माहितीसाठी येथेपहा.

  • दक्षिण कोरियामधील वापरकर्त्यांसाठी

    ही सूचना दक्षिण कोरियामधील किशोरांसाठी Uber असलेल्या वापरकर्त्यांना लागू होत नाही. कोरियामध्ये किशोरांसाठी Uber ची लागू असलेली गोपनीयता सूचना पाहण्यासाठी कृपया येथेक्लिक करा.

  • मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील वापरकर्त्यांसाठी

    माझा डेटा वापरण्यासाठी Uber कडे कोणते कायदेशीर आधार आहेत?

    तुम्ही जिथे राहता त्या डेटा संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यकतेनुसार, Uber तुमचा डेटा गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी कायदेशीर आधार म्हणून तुमच्या पालकांच्या संमतीवर अवलंबून आहे.

  • युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांसाठी

    माझा डेटा वापरण्यासाठी Uber कडे कोणते कायदेशीर आधार आहेत?

    तुम्ही जिथे राहता तेथील डेटा संरक्षण कायदे Uber ला काही ठरविक परिस्थितींमध्येच तुमचा डेटा वापरण्याची परवानगी देतात. याला तुमचा डेटा वापरण्यासाठी “कायदेशीर आधार” असणे म्हणतात. खाली दिलेल्या चार्टमध्ये आम्ही वर वर्णन केलेल्या उद्देशांसाठी Uber तुमचा डेटा वापरताना त्यांच्याकडे असलेला कायदेशीर आधार नमूद करण्यात आला आहे.

कायदेशीर आधार

वर्णन

डेटा वापरण्याचा उद्देश

करार

जेव्हा तुम्ही तुमचे किशोरांसाठी Uber खाते सेट करता आणि/किंवा Uber कडून राईड किंवा डिलिव्हरीची विनंती करता, तेव्हा तुम्हाला त्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही एक सौदा किंवा “करार” करत असतो. तुम्ही विनंती करत असलेल्या सेवा प्रदान करण्यासाठी आणि त्या करारांतर्गत आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमचा डेटा वापरणे आवश्यक असते तेव्हा हा कायदेशीर आधार लागू होतो.

  • तुमचे खाते तयार करणे किंवा अपडेट करणे
  • तुमच्या ड्रायव्हरला तुम्हाला पिकअप करण्यासाठी किंवा तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचवण्यात मदत करणे
  • तुमच्या राईड्स किंवा डिलिव्हरीज ट्रॅक करणे
  • तुम्हाला ट्रिप किंवा डिलिव्हरी अपडेट्स देणे
  • भाडे मोजणे
  • कस्टमर सहाय्य
  • तुम्ही आणि तुमचा ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्ती यांच्यामध्ये संवाद सक्षम करणे.

कायदेशीर हितसंबंध

जेव्हा Uber ला तुमचा डेटा तुमच्या गोपनीयता अधिकारांना गंभीरपणे तडा न जाऊ देता, Uber किंवा इतरांना (जसे की इतर Uber वापरकर्ते ) फायदा होईल अशा हेतूंसाठी वापरण्याची आवश्यकता असेल, तेव्हा हा कायदेशीर आधार लागू होतो.

  • सुरक्षा, सुरक्षितता आणि फसवणूक
  • कस्टमर सहाय्य
  • संशोधन आणि विकास
  • मार्केटिंग

कायदेशीर बंधन

जेव्हा आम्हाला कायद्याचे पालन करण्यासाठी तुमचा डेटा वापरणे आवश्यक असते तेव्हा हा कायदेशीर आधार लागू होतो.

  • कायदेशीर कार्यवाही आणि आवश्यकता