मुख्य सामग्रीवर जा

McCarran International Airport (LAS)

पारंपरिक Las Vegas Airport शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्ही मॅकेरन एयरपोर्टवरून एखाद्या वेगास शोला जात असाल किंवा स्ट्रिपपासून मॅकेरनपर्यंत, तुम्हाला परिचित असलेल्या Uber ॲपसह तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून LAS येथे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.

5757 Wayne Newton Boulevard, लास व्हेगास, एनव्ही 89119
+1 702-261-5211

McCarran International Airport येथे Uber सह अगोदरच राइड आरक्षित करा

McCarran International Airportला जाण्यासाठी राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. तुमच्या फ्लाइटच्या 30 दिवस आधीपर्यंत कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.
अंतिम ठिकाण
तारीख आणि वेळ निवडा

Press the down arrow key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

Selected date is 2022/08/10.

तुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल

प्रवास करण्याचा एक स्मार्ट मार्ग

जगभरात कुठेही राईडची विनंती करा

फक्त एक बटण दाबा आणि 500 हून अधिक प्रमुख हब्जवरून एयरपोर्टकरता वाहतूक सुविधा मिळवा.

एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अनोळखी शहरात रस्ते शोधत बसावे लागणार नाही.

Uber सह निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, प्रत्यक्ष त्यावेळचे किंमत निर्धारण आणि रोख रकमेविना पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

1/6

Las Vegas Airport (LAS) येथे पिकअप

राईडची विनंती करण्यासाठी तुमचे अ‍ॅप उघडा

जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा तुमच्या अंतिम ठिकाणाकडे जाण्यासाठी राईडची विनंती करण्यासाठी Uber ॲप उघडा. तुमच्या समूहाचा आकार आणि सामानाच्या गरजेनुसार योग्य असलेला LAS एयरपोर्ट वाहतूक पर्याय निवडा.

ॲपमधील सूचनांचे पालन करा

तुम्हाला LAS पिकअप पॉइंट्सबद्दल थेट ॲपमध्ये दिशानिर्देश मिळतील. पिकअप लोकेशन्स टर्मिनलनुसार बदलू शकतात. राइडशेयर पिकअप चिन्हे लास वेगास मॅकेरन एयरपोर्टवरदेखील उपलब्ध असू शकतात.

तुमच्या ड्रायव्हरला भेटा

ॲपद्वारे निर्दिष्ट केल्यानुसार तुम्हाला दिलेल्या LAS पिकअप लोकेशनवर जा. कृपया नोंद घ्या: हे लोकेशन नेहमी तुमच्या सर्वांत जवळच्या बाहेरच्या जाण्याच्या मार्गाजवळ असेलच असे नाही. तुमच्या ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि कारचा रंग ॲपमध्ये दिसेल. आत जाण्यापूर्वी तुमच्या राईडची पडताळणी करा. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

Las Vegas Airport नकाशा

McCarran Airport has 2 main terminals, Terminal 1 and Terminal 3, with a total of 5 concourses and 110 gates.

राइडर्सचे शीर्ष प्रश्न

 • होय. जगभरातील ज्या एयरपोर्ट्सवरून तुम्ही Uber सह राईडची विनंती करू शकता, त्यांच्या यादीसाठी येथे टॅप करा.

 • Uber मध्ये तुमचे पिकअप ठिकाण आणि अंतिम ठिकाण टाकून विनंती करण्यापूर्वी तुम्ही वरील Uber च्या किंमत अंदाजक मध्ये किंमतीचा अंदाज पाहू शकता. त्यानंतर, तुम्ही राईडची विनंती करता तेव्हा तुम्हाला रीअल-टाइम घटकांवर आधारित तुमची वास्तविक किंमत अ‍ॅपमध्ये दिसेल.

 • राइडशेयर पिकअप लोकेशन्स तुम्ही विनंती करता त्या राईडचा प्रकार आणि एयरपोर्टचा आकार यावर अवलंबून असू शकतात. तुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे याबद्दल ॲपमधील सूचना पाळा. तुम्ही एयरपोर्टवर निश्चित केलेले राइडशेयरिंग झोन्स सूचित करणारी चिन्हेदेखील शोधू शकता.

  तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

अधिक माहिती

Uber सह गाडी चालवायचीय?

स्थानिक नियम आणि नियमनाचे पालन करण्यासाठी राइडर्स कुठून पिकअप करायचे ते विमानतळाच्या ट्रिप्स अधिक चांगल्या कसे बनवायच्या ते शोधा.

वेगळ्या विमानतळावर जात आहात का?

जगभरातील 600 पेक्षा अधिक विमानतळांवर पोहचवणे आणि विमानतळांवरून पिकअप करणे सोयीचा फायदा घ्या.

Las Vegas Airport visitor information

मॅकेरन आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट (LAS) हा लास वेगास, नेवाडा आणि विस्तृत लास वेगास व्हॅलीला सेवा देणारा मुख्य एयरपोर्ट आहे. विमानांच्या रहदारीनुसार हा जगातील 8 वा सर्वात व्यस्त एयरपोर्ट आहे. हा लास वेगास शहराच्या दक्षिणेस सुमारे 5 मैल (8 किलोमीटर) दूर पॅराडाईजमध्ये स्थित असून शहराकडे जा-ये करणाऱ्या प्रवाशांसाठी सहज उपलब्ध आहे. रस्ता आणि रहदारीच्या आदर्श परिस्थितीमध्ये एयरपोर्ट शहरापासून सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.

LAS एयरपोर्ट टर्मिनल्स

LAS एयरपोर्ट 2 टर्मिनल्समध्ये विभागलेला आहे: टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3. टर्मिनल 1 मध्ये 4 कॉन्कोर्सेस (ए, बी, सी आणि डी) आहेत आणि टर्मिनल 3 मध्ये एक कॉन्कोर्स (ई) आहे. मॅकेरन एयरपोर्ट लाउंजेस दोन्ही टर्मिनल्समध्ये आहेत. खालील माहिती वापरून तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता.

LAS टर्मिनल 1

 • ॲलीजंट
 • अमेरिकन
 • डेल्टा
 • साउथवेस्ट
 • स्पिरीट
 • सेंच्युरियन लाउंज
 • द क्लब ॲट LAS
 • युनायटेड क्लब

LAS टर्मिनल 3

 • एरोमॅक्सिको
 • एयर कॅनडा
 • ब्रिटिश एयरवेज
 • काँडोर
 • कोपा
 • एडेलवाईस
 • युरोविंग्ज
 • हैनान
 • इंटरजेट
 • कोरियन एयर
 • लॅटॅम
 • नॉर्वेजियन
 • थॉमस कुक
 • व्हर्जिन ॲटलांटिक
 • विवा
 • व्होलारिस
 • वेस्टजेट
 • द क्लब ॲट LAS

LAS आंतरराष्ट्रीय टर्मिनल

मॅकेरन एयरपोर्टच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी बोर्डिंग फक्त टर्मिनल 3, गेट्स ई1 ते ई7 पर्यंत होते. लास वेगास एयरपोर्टवरून जगभरातील 150 पेक्षा अधिक शहरांसाठी विना थांबा फ्लाइट्स आहेत. टर्मिनल 3 मध्ये सर्व प्रवाशांना सशुल्क उपलब्ध असलेले 'द क्लब ॲट LAS' हे लाउंज आहे.

LAS येथे जेवण

संपूर्ण एयरपोर्टवर जेवणाचे आणि नाश्त्याचे 80 पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांमध्ये फास्ट फूड, आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, बार्स, रेस्टॉरंट्स आणि कॉफी शॉप्सचा समावेश आहे. तुम्हाला सिक्युरिटीमधून जाण्याआधी खायचे असल्यास टर्मिनल 1 वर सार्वजनिक खरेदी आणि तिकीट क्षेत्रांमध्ये काही पर्याय आहेत. सिक्युरिटीमधून गेल्यावर, मॅकेरन एयरपोर्टवर खाद्यपदार्थांचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

LAS च्या आसपास फिरणे

मॅकेरन आंतरराष्ट्रीय एयरपोर्टवरील प्रवासी, पीपल मूव्हर्स सिस्टिम ही एक स्वयंचलित ट्राम प्रणाली वापरू शकतात ज्यात 3 स्वतंत्र लाइन्स आहेत: टर्मिनल 1 ला सी गेट कॉन्कोर्सशी जोडणारी हिरवी लाइन, टर्मिनल 1 ला डी गेट कॉन्कोर्सशी जोडणारी निळी लाइन आणि डी गेट कॉन्कोर्सला टर्मिनल 3 शी जोडणारी लाल लाइन.

LAS मध्ये करण्याच्या गोष्टी

मॅकेरन एयरपोर्टमध्ये शिल्पे, म्युरल्स आणि मोझाईक्ससह संपूर्ण 2 टर्मिनल इमारतींमध्ये कला प्रदर्शनांचा समावेश असलेली विविध आकर्षणे आहेत. मुले लेव्हल 2 वर गेट डी येथे खेळाचे क्षेत्र वापरू शकतात आणि प्रौढ व्यक्ती संपूर्ण एयरपोर्टवर असलेल्या 1,000 पेक्षा जास्त स्लॉट मशीन्सवर खेळू शकतात. याव्यतिरिक्त, प्रवासी दक्षिण नेवाडाच्या विमानचालन इतिहासाचा तपशील असलेले एयरपोर्टचे संग्रहालय पाहू शकतात. संग्रहालयात प्रवेश विनामूल्य असून ते बॅगेज प्राप्ति क्षेत्राच्या वरच्या वॉकवेवर स्थित आहे.

LAS येथे चलन विनिमय

मॅकेरन एयरपोर्ट चलन विनिमय लोकेशन्स टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3 बॅगेज क्षेत्रांच्या जवळ आहेत.

LAS जवळची हॉटेल्स

तुमचा एखादा थांबा असो किंवा फ्लाइटला रात्रभराचा उशीर झालेला असो किंवा एखाद्या भेटीसाठी LAS एयरपोर्टजवळ मुक्काम असो, जवळपासच्या परिसरात 60 पेक्षा जास्त हॉटेल्स आणि निवासी ठिकाणे आहेत.

LAS जवळ बघण्यासारखी ठिकाणे

 • हूवर धरण
 • लास वेगास स्ट्रिप
 • रेड रॉक कॅनियन

LAS मधील प्रवाशांसाठी सुरक्षितता टिप्स

 • फक्त Uber प्लॅटफॉर्मद्वारे बुक केलेल्या ट्रिप्स घ्या: तुम्ही तुमच्या ट्रिपची स्थिती विश्वसनीय संपर्कासह शेअर करू शकता आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी सर्व आर्थिक व्यवहार प्लॅटफॉर्मद्वारे झाले पाहिजेत.
 • तुमची राईड तपासा: बसण्यापूर्वी तुम्ही मेक आणि मॉडेल, लायसन्स प्लेट आणि ड्रायव्हरचा फोटो - ॲपमध्ये जे आहे त्याच्याशी जुळते का हे तपासल्याची खात्री करा.
 • तुमच्या राईडची पडताळणी करा: रायडर्सना त्यांच्या प्रत्येक राईडची एका युनिक, 4-अंकी पिनसह पडताळणी करण्याचा पर्याय असेल जो ते त्यांच्या ड्रायव्हरला सांगू शकतात. ट्रिप सुरू करण्यासाठी ड्रायव्हरला तो स्वतःच्या ॲपमध्ये लिहावे लागेल. हे रायडर्सना योग्य कारमध्ये बसल्याची खात्री करण्यात तसेच ड्रायव्हर्सना त्यांनी योग्य रायडर पिकअप केल्याचे सुनिश्चित करण्यात मदत करते.
 • 911 वर कॉल करा किंवा संदेश पाठवा: ट्रिपदरम्यान आणीबाणी असल्यास, रायडर्स आणि ड्रायव्हर्स 911 वर कॉल करू शकतात किंवा मेसेज पाठवू शकतात आणि ते 911 ऑपरेटरशी त्वरित जोडले जातील. ट्रिपशी आणि वाहनाशी संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल (तो फोन कॉल असल्यास) किंवा ट्रिपचे तपशील टेक्स्ट मेसेजमध्ये आपोआप तयार केले जातील
 • विश्वसनीय संपर्क: राइडर्स त्यांची ट्रिप प्रियजनांसह शेअर करण्यास आपोआप सूचित केले जाणे निवडू शकतात.

LAS बद्दल येथे अधिक माहिती मिळवा.

फेसबुक
इन्स्टाग्राम
ट्विटर

या पृष्ठामध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे जी Uber च्या नियंत्रणाखाली नाही आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा त्याच्या कार्यांशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशांनी दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात व्यक्त किंवा सूचित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हमी तयार करण्यासाठी या माहितीवर कोणत्याही प्रकारे विसंबून राहू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावला जाणार नाही किंवा त्याचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार विशिष्ट आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात. प्रोमो सवलत ही केवळ नवीन वापरकर्त्यांसाठी वैध आहे. ही प्रमोशन इतर ऑफर्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही आणि टिपांवर लागू होऊ शकत नाही. मर्यादित उपलब्धता. ऑफर आणि अटी बदलांच्या अधीन आहेत.